Holi 2023 : होळी (Holi 2023) हा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. होळीच्या सणाला एक पौराणिक महत्त्व आहे आणि त्यानुसार भारताच्या प्रत्येक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा केला जातो. धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. धुळ्यात शिरपूर तालुक्यात भोंगऱ्या बाजाराला सुरुवात झाली आहे. सध्या या उत्सवामुळे शहरात मोठं उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. लोकगीत, गायन, बासरी वादन आणि ढोलाच्या तालावर आदिवासी बांधव पारंपारिक कलाविष्कार सादर करत असून या बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल होतेय. 


धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोडीद पनाखेड आणि दहिवद यांसह विविध भागांत होळीच्या पार्श्वभूमीवर भोंगऱ्या बाजाराला उत्सवाला सुरुवात झाली असून आदिवासी संस्कृतीचे दर्शन या उत्सवातून होत असते. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून विविध गावातील आदिवासी बांधव पारंपारिक वेशभूषेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत आहेत. कोरोनाच्या तब्बल दोन ते अडीच वर्षांच्या कालखंडानंतर यावर्षी प्रथमच कोणत्याही निर्बंधांशिवाय हा उत्सव पार पडत असून यामुळे मोठं उत्साहाचं वातावरण सध्या आदिवासीबहुल भागात पाहायला मिळत आहे.


नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींची पारंपरिक होळी 


नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या पारंपरिक होळीला सुरुवात झाली आहे. आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात होलिका मातेला नवस करत असतात. या दरम्यान आदिवासी बांधव नवस करत असताना आपल्या अंगावप पारंपरिक साज परिधान करतात. यामध्ये मोरपिसापासून तयार होणाऱ्या टोपाला अधिक महत्व आहे. मोरपिसाच्या टोपाला अधिक मागणी असल्याने ग्रामीण भागातील कारागिरांच्या हाताला अधिकच वेग आला असून मोठ्या प्रमाणात मोरपिसापासून टोप तयार करण्यात येत आहेत. मोरपिसापासून तयार केलेला हा टोप अधिक आकर्षक असल्याने त्याला बाजारात मागणी देखील जास्त होत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या : 


Bhandara Holi : भंडाऱ्यातील 'गवराळा' गावात 30 वर्षांपासून रंगपंचमी खेळली जात नाही, कारण...