Maharashtra Hingoli News : दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना आता यात पुढे सरसावलेत राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे. त्यांनी वसमत शहरांमध्ये भव्य असा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या साहित्यांचे वाटप करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काल (गुरुवारी) 800 दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला असून या दिव्यांग बांधवांच्या तपासण्या आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  


अलिमको समाज कल्याण जिल्हा परिषद हिंगोली आणि सामाजिकन्याय आणि अधिकरिता मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमानं आणि आमदार राजू नवघरे यांच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ऐतिहासिक आसा सर्वात मोठं दिव्यांग तपासणी शिबिर आणि कृत्रिम अवयव वाटप शिबिर ठेवण्यात आलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरात काल एकच दिवसात 800 दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून अनेकांना कृत्रिम अवयव सुद्धा देण्यात आले. यासह अंध व्यक्तींना कायम स्वरुपी पाहता यावं आणि कर्णबधिरांना ऐकता यावं यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर आणि अद्ययावत यंत्र प्रणालीच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली आहे. 


काल (गुरुवारी) हा कार्यक्रम वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. वसमत विधानसभेचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गेली दोन महिन्यांपासून प्रचार-प्रसार करण्यात आला होता. दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा यासाठी वारंवार प्रशासन स्तरावरून पाठपुरावा केला जात होता. त्यानंतर काल हा कार्यक्रम सुरू झाला आहे. 21 एप्रिल ते 22 एप्रिल हे दोन दिवस हा कार्यक्रम असणार आहे. यासाठी काल एका दिवसामध्ये 800 दिव्यांग बांधवांनी या कार्यक्रमांमध्ये तपासणी केली असून त्यामध्ये अनेक दिव्यांग बांधवांना साहित्य सुधा वाटप करण्यात आलं आहे.  
 
हिंगोली जिल्ह्यात आता पर्यंत आयोजित केलेल्या कार्यक्रमांपैकी वसमतमधील हा कार्यक्रम सर्वात मोठा आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर दिव्यांग बांधवांना मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमात अपंग असलेल्या व्यक्तीला मदत करण्याच्या दृष्टीनं तपासण्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. 


राजू भैया नवघरे प्रतिष्ठानच्या वतीनं डोळ्यांच्या मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया
 
खरंतर ग्रामीण भागांत आरोग्याला महत्त्व देणं तितकंच गरजेचं असतं वृद्ध नागरिकांच्या डोळ्यांच्या काचबिंदू आणि मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करणं हे प्रत्येक नागरिकांना आर्थिक दृष्ट्या शक्य होत नसतं. यासाठी राज्यामध्ये वसमत विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात या शस्त्रक्रियेला आमदार राजू नवघरे त्याचबरोबर राजू नवघरे प्रतिष्ठानच्यावतीनं पुढाकार घेतला जातोय. प्रतिष्ठानच्या वतीनं वसमत तालुक्यातील जवळपास दहा हजार वयोवृद्ध नागरिकांच्या मोतीबिंदू आणि काचबिंदूचा शस्त्रक्रिया यांच्या वेवेगळ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत.