जालना : दारूची दुकाने किंवा वाईन शॉप वर गर्दी होत असेल तर, गर्दी टाळण्यासाठी त्या ठिकाणी निर्बंध लावण्याच्या काहीच अडचणी नाहीत असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच  लागू होणाऱ्या निर्बंधांना नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती देखील राजेश  टोपे यांनी केली आहे. 


प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहन


प्रार्थनास्थळांवर गर्दी न करण्याचं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे. टोपे म्हणाले, मंदिर किंवा धार्मिक स्थळी एकावेळी जास्त गर्दी करू नये.  नव्या नियमावलीनुसार  मंदिर बंद केले  नाहीत. पण सामाजिक अंतर पाळून एकावेळी 40 ते 50 च्यावर  संख्या असू नये.


संसर्ग टाळण्यासाठी निर्बंध महत्त्वाचे


सरकार मनमानी करत आहे. निर्बंधाबाबत विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाहीत या विरोधकांच्या आरोपावर बोलताना टोपे म्हणाले, आपण सगळ्यांनाच विश्वासात घेतो.  पण दररोज आकडे 40 हजारांच्यावर जात असतील तर संख्येच्या माध्यमातून काळजीचे कारण आहे. म्हणून संसर्ग टाळण्यासाठी हे निर्बंध महत्त्वाचे आहेत. 


 राज्यात तिसऱ्या लाटेचा शिरकाव झालाय असं तज्ञांचं मत असून कोरोनाचे आकडे भयंकर पद्धतीनं वाढत आहेत. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर काल (शनिवारी)  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात आज मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.


काय आहेत नियम?



  • रात्री  11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी  तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. 

  • राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

  • अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध 

  • सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक 

  • प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही 

  • लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी 

  •  अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी 

  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी 

  • 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद 

  • हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार 

  • पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क  पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे

  • शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू 

  • रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल  बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे

  • नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.  क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी. 

  • नाट्यगृह, सिनेमागृहात  संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा  बंद


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :


Coronavirus In Mumbai: मुंबईकरांनो सावधान! आज 19,474 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू