राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
पुण्यात लोकसभा पोटनिवडणूक लागण्याची शक्यता, विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागी रिकामी झाली होती. लोकसभा निवडणुका वर्षभरावर आल्याने याठिकाणची निवडणूक होणार की नाही याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. मात्र आता यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे लोकसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात ज्यांची जास्त ताकद आहे त्यांनी निवडणूक लढवावी असं सांगत अजितदादांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा केला. (वाचा सविस्तर)
सहकारमंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन् शेतकऱ्याच्या खात्यात 50 हजारांचे अनुदान जमा
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास मदत झाली आहे. (वाचा सविस्तर)
नाशिक बाजार समितीच्या सभापतीपदी देविदास पिंगळे, उपसभापतीपदी उत्तमराव खांडबहाले
नाशिक (Nashik) बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणूक पार पडली असून सभापतीपदी देविदास पिंगळे (Devidas Pingle) व उपसभापतीपदी उत्तमराव खांडबहाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर शिवाजी चुंभळे (Shiwaji Chumbhle) गटाने अर्ज दाखल न करता नूतन सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. तर 30 वर्षात प्रामाणिक काम केल्यामुळे सभासदांनी पुन्हा संधी दिल्याचे नवनिर्वाचित सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. (वाचा सविस्तर)
तिघांना दिलं जीवदान! अवयव दानाचा फॉर्म भरला अन् चारच दिवसात अवयव दान करण्याची दुर्दैवी वेळ
प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे, मात्र मृत्यू हा कधी, कोणाला येईल हे सांगता येणं कठीण आहे. नाशिकच्या (Nashik) एका तरुणाबाबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी या तरुणाने अवयवदानाचा (Organ Donation) निर्णय घेत फॉर्म भरला. मात्र चार दिवसांनंतर अपघाती मृत्यू झाल्याने या तरुणाला अवयव दान करण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला. (वाचा सविस्तर)
आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांची औकात दाखवायची ताकद शिवसैनिकांच्या मनगटात; तानाजी सावंत यांचे वक्तव्य
राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील वाद काही नवीन नाही. अनकेदा हा वाद चव्हाट्यावर देखील आला आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी परभणी (Parbhani) येथे बोलताना अधिकाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांचे प्रश्न आदरानं सोडवले पाहिजेत. तसेच कुठलाही आयएएस आणि आयपीएस अधिकारी असेल त्यांना त्यांची औकात दाखवायची दणकट ताकद माझ्या शिवसैनिकांच्या मनगटात असल्याचे वक्तव्य सावंत यांनी केले आहे. (वाचा सविस्तर)