महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मोठा निकाल, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला, एकनाथ शिंदेंना दिलासा 


राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.  (वाचा सविस्तर


सगळं चुकलं, पण शिंदे सरकार वाचलं,  सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्त्वपूर्ण निरीक्षणं


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचंच सरकार राहणार आहे. शिंदे-फडणवीस सरकार वाचलं आहे. घटनापीठ काय निकाल देणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. घटनापीठाने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या कृतीवर ताशेरे ओढले, पण घटनापीठाने आमदार अपात्र ठरवण्याचा निर्णय अध्यक्षांकडे सुपूर्द केला. आणि शिंदे सरकार वाचलं... यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आणखी महत्त्वाचं भाष्य केलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार परत आणलं असतं... त्यामुळे सगळं सगळं चुकलं, पण शिंदे सरकार वाचलं, हाच या निकालाचा अर्थ आहे.  (वाचा सविस्तर)


सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निकाल : उद्धव ठाकरे  


 महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. निकालात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला तरी घटनापीठाने या प्रकरणातील अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी घटनापीठाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.  (वाचा सविस्तर)   


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस; सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश 


 राष्ट्रवादीचे (National Congress Party) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे. आज सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) देणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे (वाचा सविस्तर) 


कोणी म्हणतो जीव देईल, तर कोणी 'पुष्पा, झुकेगा नहीं साला...'; दहावीच्या उत्तरपत्रिकेत हटके डायलॉग 


दहावी-बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्ये काहीतरी हटके लिहण्याचे प्रकार यंदाही पाहायला मिळाले आहे. ही हटके उत्तरे पाहून शिक्षण मंडळाने देखील डोक्याला हात मारून घेतला आहे. कुणाच्या उत्तरत्रिकेत खाणाखुणा पाहायला मिळत आहे, तर कोणी मोबाईल क्रमांक लिहला आहे. तर मला पास करा अन्यथा आत्महत्या करेल असेही लिहण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता काही विद्यार्थ्यांनी तर चक्क पुष्पा चित्रपटातील, झुकेगा नहीं साला असे डायलॉग लिहिले आहे. (वाचा सविस्तर)