SSC HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांमध्ये काहीतरी हटके लिहण्याचे प्रकार यंदाही पाहायला मिळाले आहे. ही हटके उत्तरे पाहून शिक्षण मंडळाने देखील डोक्याला हात मारून घेतला आहे. कुणाच्या उत्तरत्रिकेत खाणाखुणा पाहायला मिळत आहे, तर कोणी मोबाईल क्रमांक लिहला आहे. तर मला पास करा अन्यथा आत्महत्या करेल असेही लिहण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता काही विद्यार्थ्यांनी तर चक्क पुष्पा चित्रपटातील, झुकेगा नहीं साला असे डायलॉग लिहिले आहे. त्यामुळे अशाप्रकारे आक्षेपार्ह लेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोटीसा देऊन सुनावणीसाठी बोलावले जात आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 500 आहे. 


काय लिहले आहेत उत्तरपत्रिकांमध्ये...


“सर कृपया मला पास करा, नाहीतर घरचे लग्न लावून देतील.त्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि मला पास करा.”


“पास नाही झालो तर वडील खूप मारतील, सर प्लीज मला पास करा.”


“सर मला परीक्षेत पास नाही केलं तर मला आत्महत्या करावी लागेल. त्यामुळे मला आत्महत्या करण्यापासून वाचवा. मला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडू नका सर..”


कारवाई केली जाणार


विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे भावनिक साद घातली असली, तरीही बोर्डाकडून मात्र हे खपवून घेतले जाणार नसल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. याबाबत विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांनी प्रतिक्रिया दिली असून, विद्यार्थ्यांनी आपल्याला पास करावे म्हणत उत्तरपत्रिकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण केले आहे. पण उत्तरपत्रिकांमध्ये उत्तराच्या वेतिरिक्त काहीही लिखाण करणे आक्षेपार्ह समजले जाते. तर प्रत्येक कृतीसाठी मंडळाची काही नियमावली असून, त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा अनिल साबळे म्हणाले आहेत. 


केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार?SSC


बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे चारशेहून अधिक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे आल्याने खळबळ उडाली आहे. तर शिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीसा पाठवत, चौकशीसाठी बोलावले आहे. या सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारी 9 मे पासून चौकशी केली जात आहे. ज्यात पहिल्या दिवशी 87 प्रकरणात आणि दुसऱ्या दिवशी 74 जणांची चौकशी करण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास संबंधित केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


HSC Exam Scam: बारावी परीक्षा घोटाळा! पेपर एकाचा अन् उत्तरे मात्र दुसऱ्यानेच लिहिले; विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI