Maharashtra Gram Panchayat Elections 2021 LIVE Updates: ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Gram Panchayat Elections 2021, Polling on 15 January 2021 LIVE Updates: राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jan 2021 10:28 PM
कामगार नेते मा. श्री. सुर्यकांत व्यं. महाडिक यांचे अल्पशा आजाराने झेन हॉस्पिटल मध्ये रात्री साडे आठ वाजता निधन झाले. चेंबूर येथे सकाळी सात ते दहा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल. अंतिमसंस्कार त्यांच्या मूळगावी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहेत.
शिरसगाव ग्रामपंचायतीमध्ये आमदार बबनराव लोणीकर यांचे सुपुत्र राहुल लोणीकर आणि राष्ट्रवादीचे युवक नेते कपिल आकात यांच्या अनोख्या युतीची बॅनर सोशल मीडियावर झळकू लागलेत, तर दुसरीकडे मूळ भाजपचा एक पॅनल ही अनोखी युती असलेल्या पॅनल च्या विरोधात उभा असणार आहे एकूण सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या सिरसगाव ग्रामपंचायतीवर यापूर्वी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांचे वर्चस्व होते मात्र आता भाजपमधील एक गटच राष्ट्रवादीच्या साह्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, सध्यातरी गावातील ही गटबाजी बघून कार्यकर्त्याची नाराजी नको म्हणून या नेत्यांनी अद्याप गावात हजेरी लावली नाही
मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील व नांदेड महापालिका क्षेत्राला लागून असणाऱ्या दाभड ग्रामपंचायतकडे आर्थिक मिळकतीच्या बाबतीत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून जिल्हाभरात पाहिलं जातं. परंतु ही ग्रामपंचायत सध्या वेगळ्याच कारणाने जिल्हाभर चर्चिली जात आहे. कारण या ग्रामपंचायतीमध्ये तीन वार्ड असून त्यात तब्बल 19 अपक्ष उमेदवार ग्रामपंचायतच्या निवडणूक रिंगणात आहेत. त्याच प्रमाणे घरातील सत्ता घरातच राहावी यासाठी सासूबाई व सुनबाई ही ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकींच्या विरोधात आमनेसामने आहेत. यात माजी सरपंच रेखा दादजवार व संगीता दादजवार या सासू सुना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे सासूसुनेच्या या वेगळ्या लढतीकडे जिल्हाभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीची नशाच काहीशी और असते म्हणतात ते खोटे नाही. याचाच प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत देवडे या गावात येत आहे. कलावती बलभीम शिंदे या 85 वर्षाच्या आज्जीबाई यंदा गावाचा विकास करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्या असून याही वयात त्या गावात फिरून प्रचार करताना दिसत आहेत . आजवर अनेकवेळा मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असायचे पण प्रत्येकवेळी माझे नाव मागे पडायचे. यंदा मात्र परिचारक गटाने मला संधी दिल्याने मी निवडणूक लढवत असून गावाची कामे मी करणार असल्याचा आज्जीबाईंचा दावा आहे
राजकारणात कोण कुणाचं नसतं असं चित्र नांदेड जिल्ह्यातील आंबेसांगवी गावात पाहण्यास मिळत आहे. कारण या गावातील बालाजी व्यंकटराव पांचाळ व व्यंकटराव सखाराम पांचाळ या दोघा बाप लेकांनाच चक्क ग्रामपंचायत मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने उभे केले आहे.त्यामुळे बापलेकाची ही निवडणूक लढत कशी होईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील 69 पैकी आठ ग्रामंपचायती बिनविरोध झाल्या असल्या तरी अनेक ग्रामंपचायतींमध्ये काही जागांवर निवडणुका होत आहेत. त्यामुळे येथे प्रचाराचा धुराळा उडाला असून, एक एक मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांना थेट शेतात जावे लागत आहे. सध्या उन्हाळी कांद्याची लागवड सुरु आहे. मजूर लवकर मिळत नसल्याने शेतकरी कुटूंबं शेतात लागवडीसाठी जात असल्याने उमेदवारांना त्यांचा शोध घेत शेतात जावे लागत असून त्यांचे मतदान आपल्याला मिळावे यासाठी उमेदवारांनी प्रयत्न सुरु केल्याच चित्र पहावयास मिळत आहे.
वाशीमच्या शेलू बाजार ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात 13 जागेकरिता 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र गेल्या पंचवार्षिकमध्ये जे सत्ताधारी विरोधक होते. त्यापैकी एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. या निवडणुकीमध्ये सगळे नवीन चेहरे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रुप ग्रामपंचायत म्हणून निघोज ग्रामपंचायत कडे पाहिलं जातं. करण निघोज गावाची मतदार संख्या दहा हजाराच्या जवळपास आहे. निघोज मध्ये एकूण 17 जागा आहेत आणि या 17 जागांसाठी 38 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. निघोज गावामध्ये दोन वर्षांपूर्वी महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीसाठी मोठा लढा दिला. त्यानंतर गावात ग्रामसभा घेऊन ठराव करून दारूबंदी देखील झाली. मात्र काहींनी गावात अनधिकृतपणे दारू विक्री सुरू केली. त्यामुळे आता संतप्त महिलांनी पुन्हा एकत्र येऊन यावेळी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दारू विक्रीस समर्थन करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात "नोटा" चा प्रचार या महिला करणार आहेत. त्यामुळे निघोज ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
दुष्काळी सांगोला तालुक्याला मेथवडे येथील ग्रामस्थांनी गावाच्या चाव्या महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतल्याने तब्बल 25 वर्षानंतर गावातील निवडणुक बिनविरोध झाली आहे. गावची सत्ता  नवदुर्गांच्या हाती सोपवली आहे. त्यामुळे सांगोल्यातील मेथवडेत काटकसरीने विकासकामे करण्याची संधी मिळाली आहे.
सांगोला तालुक्यातील मेथवडे या गावात मागील पंचवीस वर्षापासून अटीतटीच्या निवडणुका व्हायच्या पण यंदा गाव कारभाऱ्यांनी गावची सत्ता महिलांच्या ताब्यात देत नऊ महिलांच्या हातात गावाची चावी दिली आहे.
नांदेड: जिल्ह्यातील आंबेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत पिता पुत्रच एकमेकांच्या आमने सामने, OBC प्रवर्गाचा कोरम पूर्ण करण्यासाठी बाप लेकालाच उतरवले निवडणूक रिंगणात.

म्हणतात ना राजकारनात कुणी कुणाचा कायम स्वरूपी मित्र आणि कुणी कायमस्वरूपी शत्रू नसतो .फक्त सत्ता आपल्या बाजूला असावी आणि सत्ता काबीज कशी करता येईल यासाठी रस्सीखेच चालू असते.
अशीच ग्रामपंचायत निवडणुकां मधील अटीतटीची लढत सध्या नांदेड जिल्ह्यातील आंबेसांगवी गावात पाहण्यास मिळत आहे.कारण या गावातील बालाजी व्यंकटराव पांचाळ व व्यंकटराव सखाराम पांचाळ हया दोघां बाप लेकांनाच चक्क ग्रामपंचायत मध्ये प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने उभे केले आहेत.त्यामुळे बाप लेकाची ही निवडणूक लढत कशी होईल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Gram Panchayat Elections 2021, Polling on 15 January 2021 LIVE Updates: राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. या निवडणुकांसाठी गावागावात जोरदार प्रचार सुरुय. वेगवेगळ्या माध्यमांतून उमेदवार आपल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.  राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.   विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.


 


असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.


 


ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द


 


नामनिर्देशनपत्रे 30 डिसेंबरपर्यंत
या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 23 ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत स्वीकारली गेल्या. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी झाली. नामनिर्देशनपत्रे 4 जानेवारी 2021 पर्यंत मागे घेतली गेली. त्याचदिवशी निवडणूक चिन्ह वाटप झाली आहे. आता मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.


 


Maharashtra Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स 


 


25 सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार
विधानसभा मतदारसंघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिध्द केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.


 


निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.