Gram Panchayat Election : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत जरी उत्सुकता असली तरी राज्यातील (Maharashtra) अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34  जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. 


Gram Panchayat Election Live : निकालाबाबत उत्सुकता शिगेला! 'या' ठिकाणी बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम


नंदुरबार जिल्ह्यात सहा ग्रामपंचायत बिनविरोध 
नंदुरबार जिल्ह्यात 123 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया होती. त्यापैकी सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाले आहेत. काँग्रेस 04, भाजपा 01, शिवसेना ठाकरे गट 01, तर काँग्रेसच्या बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये धडगाव तालुक्यातील  शिरसाणी, सावऱ्या दिगर, शेलदा, नवापूर तालुक्यातील गंगापूर आहेत, भाजपाच्या बिनविरोध झालेली ग्रामपंचायत नंदुरबार तालुक्यातील कानळदे, ठाकरे गटाचे बिनविरोध झालेली ग्रामपंचायत, अक्कलकुवा तालुक्यातील पेचादेवी आहेत.


नांदेड जिल्ह्यातील 181 ग्रामपंचायत पैकी 21 ग्रामपंचायत बिनविरोध
नांदेडमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी झाल्याशिवाय अधिकृत नावे देता येणार नाहीत अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी दिली. पण बिनविरोध गावांची नावे लवकरच देऊ असेही त्यांनी सांगितलं आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात 32 ग्रामपंचायती बिनविरोध


जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीच्या निवडणुका


त्यापैकी 32 बिनविरोध
भाजप - 18
उद्धव ठाकरे गट - 07
ग्रामविकास पॅनल - 07


उर्वरित 293 ग्रामपंचायत साठी आज मतमोजणी


हिंगोली जिल्ह्यात हिरडगाव ग्रामपंचायत बिनविरोध
हिंगोली जिल्ह्यात हिरडगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली झाली आहे. ही ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे



अहमदनगर जिल्ह्यात पूर्णतः बिनविरोध ग्रामपंचायत


अकोले तालुक्यातील - शिळवंडी, सोमलवाडी
नेवासा तालुक्यातील- चिंचबन
नगर तालुक्यातील-पिंपळगाव लांडगा
राहाता तालुक्यातील- लोहगाव
श्रीरामपूर तालुक्यातील- कमालपूर, वांगी खु
श्रीगोंदा तालुक्यातील- बनपिंप्री.


सरपंच पदासाठी बिनविरोध


संगमनेर तालुक्यातील - डोळासणे, सायखिंडी
राहुरी तालुक्यातील-ब्राम्हणगाव
नेवासा तालुक्यातील- सुरेशनगर , खुपटी , शिरेगाव, हिंगोणी



बुलढाणा जिल्ह्यात 21 ग्रामपंचायत बिनविरोध 
बुलढाणा जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायत पैकी 251 ग्रामपंचायत साठी काल मतदान झालंय. 21 ग्रामपंचायत ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या ग्रामपंचायत पैकी 200 पेक्षा जास्त ग्रामपंचायत वर शिंदे गट आणि भाजपची सत्ता येईल, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तर त्यातही 70 टक्के सरपंच हे शिंदे गटाचे असतील असा दावा केला.  कारण मेहकर, लोणार, चिखली, बुलढाणा, देऊळगाव राजा या तालुक्यात शिंदे गटाचे प्राबल्य जास्त आहे, असे मत खासदार प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलंय.


जळगाव जिल्ह्यात 140 पैकी 18 ग्राम पंचायत बिनविरोध
जवखेडा सीम, ता एरंडोल,उद्धव ठाकरे सेना गट 
कराडी,ता पारोळा, शिंदे गट
राजवड, पारोळा, अपक्ष
सावखेडे मराठे, पारोळा, शिंदे गट
सावखेडा होळ, पारोळा, शिंदे गट
दोधे, ता रावेर
धूर खेडा ,रावेर
अटवाडे,रावेर
सिंगत,रावेर, भाजपा
चोपडाई,अमळनेर, भाजपा
नीमझरी,अमळनेर, भाजपा
ब्राम्हणे,अमळनेर, राष्ट्रवादी
अंतुरली, रांजणे,अमळनेर, भाजपा
डामरून,चाळीसगाव, राष्ट्रवादी 
अंधारी,चाळीसगाव, भाजपा
सावखेडा खुर्द,जळगाव, शिंदे गट
सुजदे,जळगाव, शिंदे गट 
चीलगाव,जामनेर, भाजपा


भाजपा,6
शिंदे गट,5
राष्ट्रवादी 2
उद्धव ठाकरे 1
इतर 4


कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध
कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील सहा ग्रामपंचायतींवर भाजपाचा झेंडा फडकलाय.  उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत. 


नाशिक जिल्ह्यात 7 ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध 
नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये निवडणुका होणार झाल्या. 7 ग्रामपंचायती संपूर्ण बिनविरोध झाल्या असून 19 गावचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. तर बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झालेल्यांची संख्या 579 इतकी आहे.  मतदान होणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य जागांची संख्या  1291 आहे तर 177 सरपंचपदासाठी मतदान झाले. 


रायगडमध्ये 50 ग्रामपंचायती बिनविरोध 
रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये महाडमधील 22, श्रीवर्धन 09, म्हसळा 07 आणि श्रीवर्धन येथील चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आता जिल्ह्यात सरपंच पदासाठी 531 तर सदस्यपदासाठी 3238 उमेदवार रिंगणात आहेत. रायगड जिल्ह्यातील 240 ग्रामपंचायतीसाठी आता निवडणुका होणार आहेत. 


बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती बिनविरोध 
बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर  ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत.  जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. गोपीनाथ गड असलेली परळी तालुक्यातल्या पांगरी गावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. या ग्रामपंचायतीमधील 11 पैकी 10 जागा धनंजय मुंडे यांनी बिनविरोध आपल्या ताब्यात घेतल्या असून सुशीला कराड यांची सरपंच पदी वर्णी लागली आहे. बिनविरोध ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला.  


सांगली जिल्ह्यातील 28 ग्रामपंचायती बिनविरोध
सांगली जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींमधील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील उपाळावी (मायणी), शाळगाव गावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार घातला आहे. यामुळे आता सांगली जिल्ह्यातील 419 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली.  


सिंधुदुर्गमध्ये 44 ग्रामपंचायती बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यातील 30 ग्रामपंचायतींवर भाजपचे कमळ फुलले आहे. सावंतवाडी तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.


सोलापूरमध्ये 15 ग्रामपंचायत बिनविरोध


सोलापूर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत एकूण 189 आहेत. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक झाली.  त्यापैकी 329 बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित 1418 जागांसाठी मतदान प्रक्रिया होईल. सरपंचपद वगळून 20 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.. सरपंचसहित 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.


अहमदनगर जिल्ह्यात 15 सरपंच बिनविरोध 
अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301 सदस्य बिनविरोध झाले, तर 15 सरपंच बिनविरोध झाले. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत, तर 2 ग्रामपंचायतमध्ये समोरच्या पॅनलचे सर्व अर्ज बाद झाल्याने तिथेही निवडणूक बिनविरोध झाली. म्हणजे जिल्ह्यात एकूण 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 203 पैकी 190 ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. 


अकोला : 4 सरपंच बिनविरोधतर एक संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध 
अकोला जिल्ह्यात  266 ग्रामपंचायतीची निवडणूक लागलेली आहे. यापैकी 4 सरपंच बिनविरोध झाले आहेत तर एक संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. तर 554 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.