Maharashtra Gram Panchayat Elections LIVE : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76 टक्के मतदान

Gram Panchayat Election 2022: आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Sep 2022 06:54 PM
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार 76 टक्के मतदान

Grampanchayat Election : राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले. राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.

Grampanchayat Election : नंदुरबारमध्ये पाच वाजेपर्यंत 72 टक्के मतदान

नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील 149 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदान केंद्रावर साडेपाचनंतर देखील मतदानासाठी रांगा असल्याचे दिसून आल्या. त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वाराच्या आत असणाऱ्या मतदारांना घेवून मतदान सुरु होते. जिल्ह्यात पाचवाजे पर्यत अंदाज 72 टक्के मतदान झाले असून  अंतिम आकडेवारी येण्यासाठी आणखीन काही वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान आज झालेल्या मतदान प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडून आलेला नाही. 

Nandurbar grampanchayat  : नंदुरबार तालुक्यातील 71 ग्रामपंचायतच्या 1.30 वाजेपर्यंत 42 टक्के मतदान, शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीसाठी 52 टक्के मतदान

Nandurbar grampanchayat  : नंदुरबार:- शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1.30 वाजे पर्यंत 52 टक्के मतदान... नंदुरबार तालुक्यातील 71 ग्रामपंचायतच्या 1.30 वाजेपर्यंत 42 टक्के मतदान झालं आहे. दुपारच्या सत्रात मतदानाच्या टक्केवारी वाढली आहे..

Nashik Gram Panchayat Election : नाशिकच्या 88 ग्रामपंचायतींसाठी दीड वाजेपर्यंत 58 टक्के मतदान 

Nashik Gram Panchayat Election : नाशिक जिल्हा तीन तालुक्यातील 88 ग्रामपंचायतींसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 58.74 टक्के मतदान झाले आहे. सध्या पावसाची संततधार सुरूच असल्याचे भर पावसातही नागरिक मतदानाचा हक्क बजावत आहेत. 88 ग्रामपंचायतींसाठी 284 मतदान केंद्र असून यामध्ये स्त्री मतदार 69 हजार 942 तर पुरुष मतदार 75 हजार 144 व इतर मतदार 1 असे 1 लाख 45 हजार 87 एकूण मतदार  संख्या आहे. तर सकाळी 7.30 ते 01.30 पर्यंत  58.74 टक्के मतदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे. 

Akole Gram Panchayat Election : 40 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आमच्या येतील-आमदार किरण लहामटे

Akole Gram Panchayat Election  राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदानानंतर राजूरकरांचं ठरलंय, 40 वर्षांची सत्ता आता संपुष्टात येईल असं वक्तव्य करताना 40 पेक्षा जास्त ग्रामपंचायती आमच्या येतील असा विश्वास आमदार किरण लहामटे यांनी व्यक्त केलाय..

Yavatal Gram Panchayat Electin: यवतमाळ जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींची निवडणूक, सकाळी 11.30 पर्यंत 28.97 टक्के मतदान

Yavatal Gram Panchayat Electin: यवतमाळ जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींची निवडणूक, सकाळी 11.30 पर्यंत 28.97 टक्के मतदान

Jalgaon Gram Panchayat Electin: चोपडा तालुक्यातील 11 आणि यावल तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीचं मतदान सुरू





Jalgaon Gram Panchayat Electin: चोपडा तालुक्यातील 11 आणि यावल तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीचं मतदान सुरू.

 

जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील 11 व यावल तालुक्यातील दोन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदानाची  प्रक्रिया पार पडत आहे.  

 

ज्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.

 

चोपडा तालुक्यातील आदिवासी बहु भागात आहेत त्यात बोरअजंटी , कृष्णापुर ,मोहरद ,पिंपरी, देव्हारी , वैजापूर, कर्जणे ,मेलाने , मोरचिडा, उमरटी , सत्रासेन अशा अकरा ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून सकाळपासून मतदानाला सुरुवात झाले आहे. 

 

चोपडा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींमध्ये 37 प्रभाग असून 99 सदस्य पदासाठी 201उमेदवार तर 11 सरपंच पदासाठी 77 उमेदवार रिंगणात आहे.  आतापर्यंतच्या मतदानाच्या प्रक्रियेत सदस्य पदासाठी चे 44 उमेदवार बिनविरोध झाले असून 54 सदस्य रिंगणात असल्याची माहिती मिळाली आहे.

 

या सर्व ग्रामपंचायतच्या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली.

 

यावल तालुक्यातील मालोद व परसोड येथील ग्रामपंचायतसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणीही संथ गतीने मतदान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.  





 Nandurbar Gram Panchayat Election: नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 10 वाजेनंतर मतदारांचा मोठा प्रतिसाद  

Nandurbar Gram Panchayat Election:  139 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून सकाळच्या सत्रात मतदारांचा प्रतिसाद अत्यल्प होता. मात्र दहा वाजेनंतर मोठ्या प्रमाणात मतदार मतदानासाठी बाहेर पडतात मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र नंदुरबार आणि शहादा तालुक्यात पाहण्यास मिळत आहे . एकूणच सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील मतदार केंद्रांवर दहा वाजेनंतर मतदारांच्या रांगा दिसून येत असून मतदारांचा मोठा प्रतिसाद या मतदानासाठी दिसून येत आहे ग्रामीण भागात शेतीच्या कामाची लगबग असल्याने मतदार राजा मतदानाचा अधिकार बजवून आपल्या शेतीच्या कामासाठी जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

Hingoli Gram Panchayat Election:  हिंगोली जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायत निवडणूक सुरू , 2 ग्रामपंचायती बिनविरोध तर 4 ग्रामपंचायतींमधील 12 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू 

Hingoli Gram Panchayat Election:  हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात येणाऱ्या चार ग्रामपंचायतींमध्ये एकूण 12 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे.  सहापैकी दोन ग्रामपंचायतीच्या बिनविरोध करण्यात आल्या असून तांबटी तांडा आणि काठोडा तांडा या दोन ग्रामपंचायतीचा बिनविरोध ग्रामपंचायतींमध्ये समावेश आहे . यामध्ये चिंचोली ,निळोबा-पिंपळा, लक्ष्मीनाईक-तांडा, संघनायक तांडा अशा एकूण चार जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे

Nandurbar Gram Panchayat Election: नंदुरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींसाठी 9.30 वाजेपर्यंत नऊ टक्के मतदान, दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता

Nandurbar Gram Panchayat Election: नंदुरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींसाठी 9.30 वाजेपर्यंत नऊ टक्के मतदान झालं आहे. दुपारच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता

Nanded Gram Panchayat Election: नांदेड जिल्ह्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, मतदानाला उत्साह

नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, नायगाव, अर्धापुर, मुदखेड,मुखेड, लोहा व कंधार तालुक्यातील 91 ग्रामपंचायतींसाठी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानास सुरुवात झालीय. शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून ही पहिलीच निवडणूक होत आहे. दरम्यान या 91 ग्रामपंचत मधील माहूर-किनवट मतदारसंघाचे आमदार हे भाजपचे असून लोहा कंधार मतदारसंघ हा शेकाप आमदारांचा असून ते सध्या शिंदे गटात आहेत. तर मुखेड,नायगाव मतदारसंघाचे आमदार हे भाजपचे आहेत. तर मुदखेड व अर्धापुर हा येथे काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण याची प्रतिष्ठा पणाला लागलीय. दरम्यान या आठ तालुक्यातील सहा तालुक्यात भाजपची सत्ता असून इतर दोन तालुके काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध माजी मंत्री अशोक चव्हाण अशी ही लढत राहणार आहे .

Nandurbar Gram Panchayat Election:  काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी असा लढती

 नंदुरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींसाठी काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी असा लढती पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर आहे. तर शहादा तालुक्यात काँग्रेस आणि भाजप तसेच स्थानिक विकास आघाड्या यांच्यात चुरस पाहण्यास मिळत आहे. मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला मतांचा जोगवा देतो आणि ग्रामपंचायत सत्ता कोणत्या पक्षाकडे जाते हे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतमोजणीतच कळणार आहे

Nandurbar Gram Panchayat Election: जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात 

Nandurbar Gram Panchayat Election: कोरोना काळात मुदत संपलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील 149 ग्रामपंचायत साठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 139 ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंचा पदासाठी  506 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात उभे ठाकले आहेत. सदस्यपदासाठी 2949 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.  


 

Akole Gram Panchayat Elections LIVE : अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू, पिचड पिता पुत्रांच्या प्रतिष्ठेची निवडणूक

Akole Gram Panchayat Elections LIVE :  अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू, पिचड पिता पुत्रांच्या प्रतिष्ठेची निवडणूक, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी उभं केलंय आव्हान..थोड्याच वेळात पिचड पिता पुत्र आणि आमदार लहामटे करणार मतदान

Gram Panchayat Elections LIVE :  नंदुरबार जिल्ह्यात मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात

Gram Panchayat Elections LIVE :  नंदुरबार जिल्ह्यात मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात, संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस दलाचे विशेष लक्ष, 139 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मतदानाला सुरुवात 

Nandurbar Maharashtra Gram Panchayat Elections LIVE : नंदुरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मतदानाला सुरुवात, सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह

Nandurbar Maharashtra Gram Panchayat Elections LIVE : नंदुरबार जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मतदानाला सुरुवात, सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह, मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात, संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस दलाचे विशेष लक्ष. 

Nanded Gram Panchayat Elections: नांदेड जिल्ह्यात 91 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, मतदान केंद्रांवर गर्दी, नागरिकांमध्ये उत्साह

Nanded Gram Panchayat Elections: नांदेड जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Nanded Gram Panchayat Elections: जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी आज 18 सप्टेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 19 सप्टेंबर 2022  रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आलेय. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी निर्गमीत केले आहेत. या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने आज  18 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणापासून तर सोमवार 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे,  सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश नांदेड जिल्ह्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे ,अशा मतदान केंद्रावर आज 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात सोमवार 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून  मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हे आदेश लागू राहतील.


 

Yavatmal Gram Panchayat Elections: 70 सरपंचपदासाठी 261 तर सदस्यपदासाठी एक हजार 31 उमेदवार रिंगणात

Yavatmal Gram Panchayat Elections: आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. या निवडणुकीत पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुक लढविणार्‍या पदाधिकारी तसेच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यात 72 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील 3, बाभूळगाव 1, कळंब 2, आर्णी 4, महागाव 1, घाटंजी 6, केळापूर 25, मारेगाव 11, झरी 8 तर राळेगाव तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. 70 सरपंचपदासाठी 261 तर सदस्यपदासाठी एक हजार 31 उमेदवार रिंगणात आहे.

 अकोले तालुक्यात भाजपचे माजी आ.वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आ.किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला

 अकोले-  तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान. भाजपचे माजी आ.वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आ.किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस. 

राज्यात सत्तांतरानंतर आज प्रथमच 608 ग्रामपंचायतींची निवडणूक

राज्यात सत्तांतरानंतर आज प्रथमच 608 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. नव्या सरकारनं घेतलेल्या थेट सरपंच निवडीच्या निर्णयानंतरची ही पहिली निवडणूक आहे. ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य निवडीसाठी आज मतदान होत आहे. सत्तांतरानंतर या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक असली तरी त्या-त्या तालुक्यातील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या,

नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75. 
धुळे: शिरपूर- 33. 
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02. 
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02. 
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01. 
वाशीम: कारंजा- 04. 
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01. 
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08. 
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01. 
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04. 
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17. 
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02. 
अहमदनगर: अकोले- 45. 
लातूर: अहमदपूर- 01. 
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08. 
कोल्हापूर: कागल- 01. 


 

अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान

अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 


 

धुळे जिल्ह्यातील (Dhule Gram Panchayat Elections)33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

धुळे जिल्ह्यातील (Dhule Gram Panchayat Elections)33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 05 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 45 मतदान होणार आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील (Nandurbar Gram Panchayat Elections) 139 ग्रामपंचायतसाठी मतदान

नंदूरबार जिल्ह्यातील (Nandurbar Gram Panchayat Elections) 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत.  जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींमध्ये गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवली आहे. 

थेट सरपंचपदासाठीही आज मतदान, तदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार

थेट सरपंचपदासाठीही आज मतदान (Voting) होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 

राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी





Gram Panchayat Election 2022: आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.






पार्श्वभूमी

Gram Panchayat Election 2022: आज राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतल्या (Grampanchayat Elections) 608 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांची रणधुमाळी होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वाधिक 139 तर यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. त्याचसोबत थेट सरपंचपदासाठीही आज मतदान (Voting) होणार आहे. मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 19 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. 


नंदूरबार जिल्ह्यातील (Nandurbar Gram Panchayat Elections) 139 ग्रामपंचायतसाठी मतदान होणार आहे. तसेच यवतमाळ जिह्यातील 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. 70 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 261 उमेदवार रिंगणात असून सदस्यपदासाठी 1031 उमेदवार रिंगणात आहेत.  जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतींमध्ये गोंधळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवली आहे. 


धुळे जिल्ह्यातील (Dhule Gram Panchayat Elections)33 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. तर जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. पुण्यातील जुन्नर तालुक्यातील 38, आंबेगाव तालुक्यातील 18, खेड तालुक्यातील 05 आणि भोर तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 45 मतदान होणार आहे.


अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या ठिकाणी भाजपचे माजी आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राजूर ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. 


विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा आणि तालुकानिहाय संख्या,


नंदुरबार: शहादा- 74 आणि नंदुरबार- 75. 
धुळे: शिरपूर- 33. 
जळगाव: चोपडा- 11 आणि यावल- 02. 
बुलढाणा: जळगाव (जामोद)- 01, संग्रामपूर- 01, नांदुरा- 01, चिखली- 03 आणि लोणार- 02. 
अकोला: अकोट- 07 आणि बाळापूर- 01. 
वाशीम: कारंजा- 04. 
अमरावती: धारणी- 01, तिवसा- 04, अमरावती- 01 आणि चांदुर रेल्वे- 01. 
यवतमाळ: बाभुळगाव- 02, कळंब- 02, यवतमाळ- 03, महागाव- 01, आर्णी- 04, घाटंजी- 06, केळापूर- 25, राळेगाव- 11, मोरेगाव- 11 आणि झरी जामणी- 08. 
नांदेड: माहूर- 24, किनवट- 47, अर्धापूर- 01, मुदखेड- 03, नायगाव (खैरगाव)- 04, लोहा- 05, कंधार- 04, मुखेड- 05, आणि देगलूर- 01. 
हिंगोली: (औंढा नागनाथ)- 06. परभणी: जिंतूर- 01 आणि पालम- 04. 
नाशिक: कळवण- 22, दिंडोरी- 50 आणि नाशिक- 17. 
पुणे: जुन्नर- 38, आंबेगाव- 18, खेड- 05 व भोर- 02. 
अहमदनगर: अकोले- 45. 
लातूर: अहमदपूर- 01. 
सातारा: वाई- 01 आणि सातारा- 08. 
कोल्हापूर: कागल- 01. 


एकूण: 608


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.