Maharashtra Govt Recruitment : देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे. देशाच्या स्वतंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून राज्यातही 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. तसा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्यामुळे कोणत्या विभागात किती भरती होणार आणि एकूण किती जागा रिक्त आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे.
राज्यात शासकीय कर्मचारी यांची 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे कोणत्या विभागात अंदाजीत किती नोकर भरती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोणत्या खात्यांमध्ये किती भरती होऊ शकते....
आरोग्य खाते – 10 हजार 568
गृह खाते – 11 हजार 443
ग्रामविकास खाते – 11,000
कृषी खाते – 2500
सार्वजनिक बांधकाम खाते – 8,337
नगरविकास खाते – 1500
जलसंपदा खाते – 8227
जलसंधारण खाते – 2,423
पशुसंवर्धन खाते – 1,047
किती जागा रिक्त?
गृहविभाग- 49 हजार 851
सार्वजनिक आरोग्य विभाग : 23 हजार 822
जलसंपदा विभाग : 21 हजार 489
महसूल आणि वन विभाग : 13 हजार 557
वैद्यकीय शिक्षण विभाग : 13 हजार 432
सार्वजनिक बांधकाम विभाग : 8 हजार 12
आदिवासी विभाग : 6 हजार 907
सामाजिक न्याय विभाग :3 हजार 821
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांमध्ये नोकर भरती होऊ शकली नाही. त्यामुळे देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 हजार नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही कालावधीत ही वेगवेगळ्या विभागाच्या नोकर भरती होताना पाहायला मिळतील. मात्र गेल्या काळात नोकर भरती करत असताना अनेक वादग्रस्त निर्णय होताना पाहायला मिळाले आहेत. आता पारदर्शकपणे ही नोकर भरती राज्य सरकार कशा पद्धतीनं करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
ही बातमी देखील नक्की वाचा- Health Recruitment : आरोग्य विभागाची मोठी भरती; दहा हजारांहून अधिक जागा भरणार