Matoshree Bungalow Shiv Sainik : गुरूवारी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) काल शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकीकडे जेव्हा राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडत होता, त्याचवेळी दुसरीकडे हातात पोस्टर घेऊन उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री समोर एकमेव कार्यकर्ता उभा होता. या पोस्टरवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा फोटो होता. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकला बोलावून घेतलं आणि आपुलकीने विचारपूस केल्याचे समजते.  एबीपी माझाच्या प्रतिनिधीनी या कार्यकर्त्याशी बातचीत केली असता त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 


"उद्धव ठाकरे हेच माझ्या मनातील मुख्यमंत्री"


मोसिन अन्सारी असं या ठाकरे समर्थकाचं नाव असून ते मिरारोड येथील रहिवाशी असल्याचे समजते.  म्हणाले,  माझा काहीच राजकीय हेतू नसून मी केवळ उद्धव ठाकरे यांना मनापासून आपलं मानतो. आताच नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोणीही बसलं तरी, उद्धव ठाकरे हेच माझ्या मनातील मुख्यमंत्री असतील असे अन्सारी यांनी सांगितलं.


आय लव्ह यू उद्धव सर...! काय लिहलं होतं पोस्टरमध्ये?


पोस्टरमध्ये लिहलं होतं की, वह एकता में विश्वास करता है, लेकिन कुछ बांटना और राज करना चाहते है, खुर्सीपर कोई भी बैठे, हमारे तो सीएम उद्धव बालासाहेब ठाकरे है, आय लव्ह यू उद्धव सर, always in my heart, great CM 


 



 


उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा


एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले होते. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला. महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही इच्छा


येत्या शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी 


महाराष्ट्रात शिंदेशाहीची सुरुवात  झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला. आता नव्या सरकारची बहुमत चाचणी येत्या शनिवारी होणार आहे.   यावेळी विधानसभा अध्यक्षाची देखील  निवड होणार आहे. विधानसभेचं विशेष अधिवेशन होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितले आहे. शनिवारी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष सत्र होणार आहे. बहुमत चाचणीवेळी विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणाप आहे. महाराष्ट्र विधीमंडळाचे विशेष अधिवेशन 2  आणि 3 जुलैला होणार आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षपद भाजपकडे राहणार आहे.


 


हे देखील वाचा -