मुंबई : नीती आयोगाच्या वार्षिक अहवालात शेतीपूरक योजनांच्या पुढाकारात महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. असं असलं तरी उद्योगात मात्र महाराष्ट्र दहाव्या क्रमाकावर आहे. उद्योगधंद्यांमध्ये आंध्र प्रदेशाने पहिलं स्थान पटकावलंय.

2015 साली पहिल्या क्रमांवर असलेल्या गुजरातची मात्र तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने उद्योगात बाजी मारली आहे. नीती आयोगाने 340 निकष लक्षात घेऊन ही आकडेवारी जाहीर केली.

महाराष्ट्राची उद्योगात घसरण होणं, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी चिंताजनक बाब आहे. कारण उद्योग वाढवणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांचा उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा खोटा ठरल्याची चिन्हं आहेत.

उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करणं, जाचक अटी सोडवण्यात महाराष्ट्राला अपयश आलं असल्याचं निती आयोगाने म्हटलं आहे.

उद्योग व्यवसायात आघाडीवरील टॉप 10 राज्य

  1. आंध्रप्रदेश

  2. तेलंगणा

  3. गुजरात

  4. छत्तीसगड

  5. मध्यप्रदेश

  6. हरयाणा

  7. झारखंड

  8. राजस्थान

  9. उत्तराखंड

  10. महाराष्ट्र