चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील समाधान पूर्ती सुपर मार्केटला काल रात्री मोठी आग लागली. या भीषण आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं आहे.
चंद्रपूर शहरातील महत्त्वाच्या जटपुरा चौकात पोपट बिल्डिंगमध्ये हे सुपर मार्केट आहे. काल रात्री 1 वाजताच्या सुमारास सुपर मार्केटच्या गोदामात अचानक आग लागली. काही वेळातच ही आग संपूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली. सुदैवाने या आगीत कुणाल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही मात्र सुपर मार्केटमध्ये असलेला कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.
सध्या या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असून अग्निशमन विभागाच्या 6 गाड्या या कामात तैनात करण्यात आल्या आहेत.