Dhule Crime News : अवैध सावकारी करणाऱ्या धुळे शहरातील राजेंद्र बंब याच्या विरोधात धुळे शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला आहे. काल मंगळवारी सलग चौथ्यांदा केलेल्या कारवाईत शहरातील विविध पतसंस्थांमध्ये असलेला ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे.
सुमारे 20 कोटी रूपये जप्त
धुळे शहरातील (Dhule City)नामांकित एलआयसी किंग म्हणून ओळख असलेल्या अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या विविध बँकेतील खात्याची आर्थिक गुन्हे शाखेने तपासणी केली. काल मंगळवारी सलग चौथ्यांदा केलेल्या कारवाईत शहरातील विविध पतसंस्थांमध्ये असलेला ऐवज पोलिसांच्या हाती लागला असून यात 210 सौदा पावत्या, चार ते पाच विदेशी चलन, 2 कोटी 47 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच 34 सोन्याचे कॉइन प्रत्येकी वजन चार ग्रॅम, तसेच जवळपास 2 हजार 400 फिक्स डिपॉझिट च्या पावत्या ज्यांची अंदाजे रक्कम दोन ते अडीच कोटी रुपये आहे असा सुमारे 4.5 कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे आत्तापर्यंत सुमारे वीस कोटी रूपये पोलिसांनी यात जप्त केले असून या सर्व मालमत्तांची चौकशी पोलिस यंत्रणेकडून करण्यात येणार आहे तसेच विविध जिल्ह्यात देखील आणखी काही मुद्देमाल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याचा देखील तपास केला जाणार आहे. नागरिकांनी अवैध सावकारी विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.
योगेश्वर पतसंस्थेतील लॉकरची तपासणी, 20 कोटींच्या आसपास ऐवज सापडले
तपासणीत 2.47 कोटी रोख रक्कम, 6 लाखांची नाणी. विविध लोकांच्या नावाने ठेवलेल्या 2400 मुदत ठेवी, त्यांची किंमत अंदाजे 2 कोटीहून अधिक आहे. तसेच 100 कोरे चेक सापडले. सापडलेला एकूण ऐवज 4.5 कोटी असून आजपर्यंतचा ऐवज 20 कोटींच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी पाच लॉकर तपासले, कोट्यवधी रुपयांच्या नोटा हाती लागल्या
धुळे शहरातील (Dhule City)नामांकित एलआयसी किंग म्हणून ओळख असलेल्या अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या विविध बँकेतील खात्याची आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी 3 जून रोजी तपासणी केली. त्याच्याकडे तब्बल दहा कोटी 72 लाख रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये विदेशी चलनही पोलिसांच्या हाती लागले असून तपास यंत्रणांनी एका बँकेत सहापैकी पाच लॉकर तपासले. त्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.धुळे जिल्हा पोलिसांनी (Dhule Police) अवैध सावकारीच्या विरोधात कंबर कसली आहे. धुळे शहरातील राजेंद्र बंब (Rajendra Bamb) याच्या विरोधात त्यांच्याकडे काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे अवैध सावकारी विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या मालमत्तेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसात सुमारे 15 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांच्या हाती लागली असून काल केलेल्या बँकेच्या तपासणीत काही विदेशी चलनाच्या नोटा देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत. राजेंद्र बंब याच्याकडे एवढी मालमत्ता असून देखील इतके दिवस आयकर विभागाचे लक्ष गेले कसे नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
कोण आहे राजेंद्र बंब
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती
Wardha: आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले