Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 18 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Feb 2022 05:17 PM
Delhi : दिल्लीत आज 635 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Delhi : दिल्लीत आज 635 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची भर

राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून   रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 29 तासात 4 हजार 394  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Mumbai : मुंबईत 201 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Mumbai : मागील काही दिवसांत वाढत असलेली मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या स्थिर झाली आहे. शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईतील अनुक्रमे 202 आणि 201 रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी मुंबईत 259 नवे कोरोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे मागील तीन दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्यामध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी दोन हजार 68 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर चार हजार 709 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत कोरोनामुळे 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 21हजार 159 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.


राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्यात चार हजार 709 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 76 लाख 86 हजार 670 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.85 टक्के इतके झाले आहे. मागील 24 तासांत राज्यात 15 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे.  दरम्यान, राज्यात आजपर्यंत सात कोटी 70 लाख एक हजार 972 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,55,359 (10.20 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात दोन लाख ३७ हजार २५२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर एक हजार 139 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


3531 जणांची ओमायक्रॉनवर मात –
दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभराची चिंता वाढवली होती. महाराष्ट्रातही ओमायक्रॉन विषाणूने हाहाकार माजवला होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत चार हजार 456 जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, तीन हजार 531 जणांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.  आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 931 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.


मुंबईत शुक्रवारी 202 नवे रुग्ण -
 मुंबईत मागील दोन दिवसत वाढत असलेली नव्या कोरोनाबाधितांची संख्या  (Corona Updates) आज कमी झाली आहे. आज 202 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कालच्या तुलनेत 57 रुग्ण कमी आढळले आहेत. कारण गुरुवारी 259 नवे कोरोनाबाधित आढळले होते. मागील तीन दिवस मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाले नसताना आज मात्र एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2627 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 220 दिवसांची वाढ झाली आहे. कारण मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता.  मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 202 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 365 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 780 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 259 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 319 बेड्सपैकी केवळ 838 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.03% टक्के इतका झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.