मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा दर काही प्रमाणात घटत असला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे आणि कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात परिस्थिती अजूनही चिंताजनक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारला या जिल्ह्यात अधिक लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.


कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी परिस्थिती चिंताजनक म्हणावी लागेल. त्यामुळे येत्या सोमवारपासून (14 जून) अनेक जिल्ह्यांचा स्तर बदलणार आहे आणि त्यानुसार निर्बंध लागू केले जाणार आहेत. मात्र राज्य सरकारला पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि कोकण विभागातील या तीन जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावा लागणार आहे.




 

या सहा जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात आणि या आठवड्यात काय परिस्थिती होती?


कोल्हापूर
या आठवड्यात
संसर्ग दर - 15.85 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण- 67.41 टक्के


मागील आठवड्यात
संसर्ग दर - 15.85 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 71.50 टक्के


पुणे
या आठवड्यात
संसर्ग दर - 11.11 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 13 टक्के


मागील आठवड्यात
संसर्ग दर- 13.62 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 20.45 टक्के


सातारा 
या आठवड्यात
संसर्ग दर - 11.30 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 41.6 टक्के


मागील आठवड्यात
संसर्ग दर - 15. 62 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 61.55 टक्के



रत्नागिरी
या आठवड्यात
संसर्ग दर - 14.12 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 48.75 टक्के


मागील आठवड्यात
संसर्ग दर - 16.45 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 51.81 टक्के


रायगड
या आठवड्यात
संसर्ग दर - 13.33 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 21.32 टक्के


मागील आठवड्यात
संसर्ग दर - 19.32 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 38.30 टक्के


सिंधुदुर्ग
या आठवड्यात
संसर्ग दर - 11.89 टक्के आहे
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 51.59टक्के


मागील आठवड्यात
संसर्ग दर - 12.70 टक्के
व्यापलेल्या ऑक्सिजन खाटांचे प्रमाण - 66.56 टक्के


कोरोना रुग्ण, मृत्यू संख्येबाबत कोणतीही लपवाछपवी नाही; जाणून घ्या नेमकी कशी संकलित केली जाते माहिती


या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यास यंत्रणा कमी पडत असल्याच निदर्शनास येत आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था कमी असल्याने हा धोका अधिक जाणवत आहे. मुंबई शहरात काही प्रमाणात रुग्ण संख्या घटली असली तरी संभाव्य धोका लक्षात घेता तिसऱ्या स्तरातील निर्बंध अद्याप शिथिल केलेले नाहीत.