Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) तीन विषाणूचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती मिळत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार एक्सबीबी हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट राज्यात आढळून आला असून यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्याचं बोललं जात आहे. तसेच महाराष्ट्रात बीए 2.3.30 आणि बीक्यू.1 हे नवे व्हेरिएंट शिरकाव करत असल्याचे समोर आले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढणार?
राज्यातील कोव्हिड रुग्णसंख्या मागील आठवड्याच्या तुलनेत 17.7 टक्क्यांनी वाढली असून ठाणे, रायगड आणि मुंबई भागामध्ये ही वाढ अधिक ठळक प्रमाणात दिसतेय. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे. कोविडचा नवीन व्हेरिअंट भारतात देखील आढळून आला आहे. नुकताच ओमायक्रॉनच्या आणखी एका उप-प्रकाराचे रुग्ण देशात सापडले आहेत. या व्हेरिअंटला XBB असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आले आहेत. Omicron चे नवीन व्हेरिएंट Bf.7 आणि Ba.5.1.7 आहेत. ओमिक्रॉनच्या या संसर्गजन्य प्रकाराच्या नवीन व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन व्हेरिएंट राज्यात आढळला
राज्यात बीए. 2.75 चे प्रमाण 95 टक्के वरून 76 % वर आले आहे. तर एक्सबीबी हा नवीन व्हेरिएंट राज्यात आढळला असून त्याचे प्रमाण वाढताना दिसतंय, हा व्हेरियंट बीए.2.75 पेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. फ्ल्यू सारखा कोणताही आजार अंगावर काढू नका, तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना दिल्या आहेत. भारतात तमिळनाडूमध्ये XBBचे रूग्ण आढळून आले. तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये नव्या व्हॅरिएंटच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.
'ही' आहेत लक्षणे?
-ताप
-गळ्यात खरखर वाटणे
- थंडीच्या दिवसांत विशेष काळजी घेणे आवश्यक
इतर महत्वाच्या बातम्या