Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या जामिनाला ईडीनं (ED) विरोध केला आहे. आज संजय राऊत यांच्या वकिलांकडून कोर्टात त्यांची बाजू मांडली जाणार आहे. राऊतांच्या जामीन अर्जावर 11 ऑक्टोबरला सुनावणी झाली होता. मात्र, वेळेअभावी त्यांचा युक्तिवाद पूर्णपण होऊ शकला नव्हता. त्यामुळं सुनावणी 17 ऑक्टोबरला घेण्याचे सांगितले होते. मात्र, पुन्हा एक दिवसानं सुनावणी पुढे ढकलत 18 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला होता.


 संजय राऊतांवर आरोप नेमके काय? 


पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री उशिरा ईडीनं अटक केली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ईडी आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला. संजय राऊत हेच प्रविण राऊत यांना समोर करुन सर्व व्यवहार करत होते असं ईडीने म्हटलं आहे. 


ईडीचा दावा काय?


दरम्यान, ईडीने (ED) केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले होते.


महत्त्वाच्या बातम्या:


अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर भाजपला राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र 'स्क्रिप्ट'चा भाग : संजय राऊत