Maharashtra Corona LIVE Updates : राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता

Maharashtra Covid-19 Cases Lockdown Updates : राज्यातील कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊन संबंधित अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 May 2021 07:29 PM
दहावीच्या परीक्षेसंदर्भात हायकोर्टात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं  मागितली मुदतवाढ

दहावीच्या परीक्षेसंदर्भात हायकोर्टात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं  मागितली मुदतवाढ,


तर बारावीच्या परिक्षा घ्यायच्या की नाहीत यावर अद्याप निर्णय घेणं बाकी, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या निर्णयाची राज्य सरकारला प्रतिक्षा,


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात केवळ 15 टक्के कर्मचारीवर्गाची उपस्थिती असल्याचं कारण पुढे,


हायकोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार या आठवड्यात राज्य सरकारचं प्रतिज्ञापत्र दाखल होणं आवश्यक होतं,

महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना डिस्चार्ज तर 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Corona update : महाराष्ट्रात आज 31,671 रुग्णांना डिस्चार्ज तर 20,740 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, राज्याचा रिकव्हरी रेट 93.24 टक्क्यांवर  

मुंबईत मागील 24 तासात कोरोना रुग्णाचा आकडा हजाराच्या आत

Mumbai Corona update : मुंबईत मागील 24 तासात कोरोना रुग्णाचा आकडा हजाराच्या आत, 1239 रुग्णांना डिस्चार्ज, रुग्ण दुपटीचा दर 370 दिवसांवर #corona #mumbai 

Maharashtra lockdown update : राज्यातील जिल्हाबंदी 10 जूननंतरच उठण्याची शक्यता

Maharashtra lockdown update : कोरोनाची रुग्णसंख्या बघता 10 जून पर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवावी अशी चर्चा कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली होती. काही जिल्ह्यात विशेषतः ग्रामीण भागात वाढत असलेली रुग्णसंख्या बघता आता असलेले निर्बंध तसेच ठेवावे असे मत आरोग्य विभागाने मांडले होते. पण काही विभागांनी निर्बंध शिथिल करावे अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा बंदी ही 10 जून नंतरच उठण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 जून पासून शासकीय आणि खासगी कार्यालय 50 टक्के क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती आहे.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना महिन्याला पाच हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार

कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ बालकांना महिन्याला पाच हजार रुपये देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. या अनाथ मुलांच्या खात्यात काही रक्कम डिपॉझिट ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव असून त्यातून त्या मुलांना महिन्याला एक ठराविक रक्कम मिळू शकेल. या अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असाही प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.  याबाबत आज महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार असून त्यानंतर निर्णय जाहीर होईल. याआधी मध्य प्रदेश सरकारने या मुलांना अशा पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतला होता.

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 6 ते 7 दिवस कडक लॉकडाऊनची शक्यता; पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 6 ते 7 दिवस कडक लॉकडाऊन लागू शकतो. आज दुपारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासोबतच्या चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी संध्याकाळी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात सध्या रोज 400 ते 500 रुग्ण आढळून येत आहेत. ही बाब चिंतेची आहे. शिवाय, रेड झोनमध्ये जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावावा का याचा आढावा घेतल्यानंतर याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.  

राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय, काही ठिकाणी नियम शिथिल करणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील अशी माहितीही त्यांनी दिली. 

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत 

कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये 13 तज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत.

नांदेड जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा वाढता धोका

जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे 152 रुग्ण सापडले आहेत. उपचार घेऊन बरे झालेले 47 रुग्ण तर 80 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात 25 जणांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात नॉन कोविड रुग्णांना म्युकरमायकोसिस झाला असल्याचा एकही रुग्ण नसल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी माहिती दिलीय. 

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन, 14 बालरोग तज्ज्ञांचा समावेश

कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये 13 तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोना विषाणूत होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत त्यांनी चर्चाही केली केली होती. लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचारपद्धती विकसित करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ.बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ, प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात गुरुवारी 21,273 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 34,370 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 425 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 3,01,041 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  


आजपर्यंत एकूण 52,76,203 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 93.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 425 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,40,86,110 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56,72,180 (16.64 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 22,18,278  व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 19,996  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


'या' शहर आणि जिल्ह्यात एकही मृत्यू नाही


सरकारी आकडेवारीनुसार राज्यात मागील 24 तासात चंद्रपूर शहर, गोंदिया जिल्हा,अमरावती शहर, अकोला शहर, नांदेड शहर, परभणी शहर, हिंगोली, जालना, औरंगाबाद शहर, औरंगाबाद जिल्हा, जळगाव शहर, धुळे शहर, धुळे जिल्हा, मालेगाव शहर, वसई विरार शहर, पालघर जिल्हा, मीरा भायंदर शहर, भिवंडी शहर या ठिकाणी कोरोनामुळं एकाही मृत्यूची नोंद नाही.  


मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान


मुंबईत मागील 24 तासात 1,362 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत मुंबई 6,57,301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवर आला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 351 दिवसांवर गेला आहे.  मुंबईत सध्या 28,310 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  मुंबईत काल 1,362 रुग्णांचे निदान झाले होते तर 1,021 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.  


पुणे शहरात दिवसभरात नवे 588 कोरोनाबाधित! 


पुणे शहरात आज नव्याने 588 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 4 लाख 68 हजार 129 इतकी झाली आहे. शहरातील 921 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 51  हजार 991 झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 193 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 24  लाख 68 हजार 709 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 7 हजार 990 रुग्णांपैकी 996 रुग्ण गंभीर तर 1862 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 33 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 148 इतकी झाली आहे.


राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय, काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे


राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यात सुरु असलेला लॉकडाऊन आणखी वाढवण्याबाबतही चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात येणार आहे. सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही. याबाबचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करुन घेतील अशी माहितीही त्यांनी दिली. 


कोरोना व्हायरस नव्या प्रकारचा आहे, तो मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाऊन पूर्णपणे हटवता येणार आहे. मात्र लॉकडाऊनमध्ये काय शिथिलता देता येईल याबाबतचे बारकावे तपालसे जातील, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.