Maharashtra corona cases : राज्यात आज राज्यात 63,309 नवीन कोरोना रुग्णांचे निदान, 61181 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.4 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज सर्वाधिक 985 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 26527862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4473394 (16.86टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबई महापालिका क्षेत्रात आज 4926 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे जिल्ह्यात 3430 पुणे मनपा क्षेत्रात 4126 तर पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 1916 नवीन रुग्णांची नोंद आज झाली आहे.
कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज 1091 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. तर एका दिवसात 1470 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज.उपचार घेत असलेले रुग्ण 13455 आहेत. 24 तासात कोरोना बाधित 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
परभणी- जिल्ह्यात आज 788 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात 1037 नवीन बाधीत रुग्णांची भर पडली आहे. तर 24 तासात 18 रुग्णांचा झाला मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकुण 7091 ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, उरण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात दिवसभरात एक हजार ४९३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा हद्दीत आढळले 523 रुग्ण तर ग्रामीण भागात १६७ रुग्णांची नोंद झाली आहे. अलिबाग येथे २०५ , पेण १२३, उरण ८४, खालापूर ८२, माणगाव ७५ रुग्णांची नोंद झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आज जिल्ह्यात ८७२ नवीन रुग्णांचे निदान 11 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मृत्यूदर २.३२ % एवढा आहे. आजपर्यंत एकूण २९,०१६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate ) ८०.६९ % एवढे झाले आहे . आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २१३,८८० प्रयोगशाळा नमुन्यापैकी ३६,६६५ ( २७.८८ % ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत .