मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  आज  58  हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 52 हजार 412 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 39 लाख 59 हजार 240 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 76 हजार 520 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.04 टक्के  झाले आहे.

राज्यात आज एकूण 351 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.5६ टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 824 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 351 मृत्यूंपैकी 220 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 85 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 46 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 7381 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

मुंबईत गेल्या 24 तासात 7381 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 87 हजार 882 वर पोहोचली आहे.  सध्या 85 हजार 321 एकूण सक्रिय रुग्ण आहेत. 

देशात 92 दिवसात 12 कोटी लसींचे डोस

भारतात कोरोना लसीकरणाचे काम वेगात सुरू आहे. 92 दिवसात 12 कोटी कोरोना लस डोस देण्यात आले आहेत. 12 कोटी लसींचा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला 97 दिवस आणि चीनला 108 दिवस लागले होते.  देशभरात आतापर्यंत दिलेल्या लसींच्या डोसपैकी  59.5 टक्के लसींचे डोस आठ राज्यांत दिले गेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 1 कोटी 21 लाख 39 हजार डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात या चार राज्यांत प्रत्येकी  एक कोटीपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.