मुंबई : राज्यात आज 14 हजार 123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 हजार 949 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट 94.28 टक्क्यांवर पोहचला आहे. याआधी 10 मार्च रोजी 13 हजार 659 रुग्णांची नोंद झाली होती.  


दरम्यान आज 477 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के झाले आहे. राज्यात सध्या 2 लाख 30 हजार 681 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात 54 लाख 31 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 96 हजार 198 रुग्णांना आतापर्यंत जीव गमावला आहे. 


आज नोंद झालेल्या एकूण 477 मृत्यूंपैकी 340 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 137 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्युमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ३७७ ने वाढली आहे. 


देशातील कोरोनाची सद्यस्थिती


केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत देशामध्ये 1 लाख 27 हजार 510 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. 13 एप्रिलला देशातील कोरोना रग्णांचा आकडा इतका कमी होता. ज्यानंतर तब्बल दिवसांनंतर हा आकडा पुन्हा दिसला आहे. गेल्या  24 तासांत कोरोनामुळं 2795 नागरिकांचा मृत्यू झाला. तर, 2 लाख 55 हजार 287 कोरोनाबाधितांनी या संसर्गावर मात केली. 


देशातील एकूण कोरोना आकडेवारी 


एकूण कोरोना रुग्ण - 2 कोटी 81 लाख 75 हजार 44
कोरोना मुक्त झालेले रुग्ण - 2 कोटी 59 लाख 47 हजार 629
एकूण सक्रिय रुग्ण - 18 लाख 95 हजार 520 
एकूण मृत्यू - 3 लाख 31 हजार 895


राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत 21.6 कोटी पेक्षा जास्त डोसचं लसीकरण


देशात आतापर्यंत राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत 21.6 कोटी पेक्षा जास्त  लसीच्या मात्रा देण्यात आल्या.  यामध्ये 17.12 कोटी नागरिकांना पहिला डोस, तर 4.48 कोटी नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना 1.67 कोटी, फ्रन्टलाईन वर्कर्सना 2.42 कोटी, 45 वर्षापुढील नागरिकांना 15.48 कोटी, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 2.03 कोटी लस देण्यात आल्या आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या