मुंबई : कोरोना प्रतिबंधक लशीच्या मात्रा सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत 3 कोटी 27 हजार 217 नागरिकांना लशींच्या मात्रा देऊन त्यांना संरक्षित करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला होता. एकीकडे कोरोना संसर्गाचा मुकाबला करत असताना लसीकरणाची मोहिम देखील वेगाने पुढे जात होती. 


3 कोटी 27 हजार 217 या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून सर्वाधिक नागरिकांना लस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिला असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी गुरुवारी सांगितले.






महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण कमी आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेसंदर्भात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदनही केले आहे.  


महाराष्ट्रात 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला 22 जूनपासून  मान्यता देण्यात आली.