मुंबई : राज्यातील  कोरोनाचा प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून  राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे.   आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.   गेल्या दहा दिवसात तिसऱ्यांगा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. या अगोदर 2 मार्च, 7 मार्चला शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  359 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात गेल्या 24 तासात 559 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 


राज्यात आज  शून्य  कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज शून्य  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख  19 हजार 100  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे.  सध्या राज्यात  27  हजार 116 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 604  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 84 लाख 19 हजार 100  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या 3009 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 3009 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहे. मुंबईमध्ये 421 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. मुंबईच्या जवळ असणारा ठाणे जिल्हा अॅक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत  दुसऱ्या क्रमांकावर आहे. ठाण्यात 263 रुग्ण आहे. अहमदनगरमध्ये 238 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. 


 देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4575 रुग्ण


  देशात आज कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 4 हजार 575 नवीन रुग्ण आढळले असून 145 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 3 हजार 993 रुग्ण आणि 108 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या वाढली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 59 हजार 442 झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 335 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 13 हजार 566 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.


महत्वाच्या बातम्या


Coronavirus Cases Today : कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय! देशात गेल्या 24 तासांत 6396 नवे कोरोनाबाधित, 201 मृत्यू


Unlock Guidelines : लसीकरणावर भर द्या, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; असे असतील निर्बंध!


Unlock Guidelines : लसीकरणावर भर द्या, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; असे असतील निर्बंध!