Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 6 हजार 396 नवीन रुग्ण आढळले असून 201 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 6 हजार 561 प्रकरणे आणि 142 मृत्यूची नोंद झाली. म्हणजेच कालच्या तुलनेत आज कोरोनाबाधितांची कमी नोंद झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या 85 हजार 680 वर


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरात देशात 13 हजार 450 लोक बरे झाले होते, त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या 69 हजार 897 वर आली आहे. त्याचबरोबर या कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 14 हजार 589 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 23 लाख 67 हजार 70 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.





 


महाराष्ट्रात 467 नवे रुग्ण, 12 जणांचा मृत्यू


महाराष्ट्रात गुरुवारी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर संसर्गाची 467 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, आज आलेल्या संसर्गाच्या नवीन रुग्णांपैकी 243 प्रकरणे ओमायक्रॉन प्रकाराची आहेत. विशेष म्हणजे बुधवारी महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाने एकाचाही मृत्यू झाला नाही.
महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 78,67,391 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे आणि 1,43,718 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. बुधवारी राज्यात संसर्गाची 544 नवीन प्रकरणे आढळली, परंतु कोविडमुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. राज्यात कोरोनामुळे शेवटच्या वेळी 1 एप्रिल 2020 रोजी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता.


आतापर्यंत सुमारे 178 कोटी डोस देण्यात आले


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना लसींचे 178 कोटी डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभराक 24 लाख 84 हजार 412 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 178 कोटी 29 लाख 13 हजार 60 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha