मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. आज राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. या आठवड्यात दुसऱ्यांदा एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. या अगोदर 2 मार्चला शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 225 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 461 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 18 एप्रिल 2020 नंतरचा राज्यातील आजचा सर्वात कमी रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात आज शून्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज शून्य रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 17 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08 टक्के आहे. सध्या राज्यात 28 हजार 975 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 83 लाख 14 हजार 109 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 3472 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 3472 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहे. मुंबईमध्ये 484 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. अहमदनगरमध्ये 341 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. मुंबईच्या जवळ असणाऱ्या ठाणे अॅक्टिव्ह रुग्णांच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
देशात गेल्या 24 तासांत 4362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 66 जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान सक्रिय रुग्णांची संख्या 54,118 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 9,620 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. यासह, बरे झालेल्या लोकांची संख्या 4,23,98,095 झाली आहे. कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकता दर 0.71 टक्के आहे. आतापर्यंत 77.34 कोटी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 24 तासात 6,12,926 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या