मुंबई : राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत  आहे.  राज्यात आज 3659 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 3356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत  आज सर्वाधिक म्हणजे 1751 रुग्णांची भर पडली आहे. 


एका कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात आज एकूण एका कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 77,68,958 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.83 टक्के इतकं झालं आहे. 


राज्यात आज एकूण 24,915 सक्रिय रुग्ण


राज्यात आज एकूण 24,915 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 14146 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 5569 सक्रिय रुग्ण आहेत


 देशातील कोरोना संसर्गात मोठी घट, धोका मात्र कायम


गेल्या 24 तासांत 9923 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. देशात सध्या 79 हजार 313 रुग्ण कोरोना विषाणूंच्या संसर्गावर उपचार घेत आहेत सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. भारतात एकूण 5 लाख 24 हजार 890 रुग्णांचाय कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात 12 हजार 781 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 18 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याच्या तुलनेनं आज समोर आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं दिसून येतं.