Abhijeet Bichukale : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) यांनी नुकतच एक वक्तव्य केलं आहे. अभिजीत बिचुकले हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आळंदी येथे गेले होते. त्यावेळी त्यांना सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकिय घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रपती, पंतप्रधान होण्यासाठी धडपड
अभिजीत बिचुकले म्हणाले, 'यांची नाटकं सुरु आहेत. संपूर्ण जनतेला यांनी वेठीस धरलेलं आहे. कोणत्या माणसाला निवडून द्यायचं हे जनतेनं आता शिकायला हवं. यासाठी लोकांना अभिजीत बिचुकले हा पर्याय आहे. मी सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे. कर्म करा, असं ईश्वरानं सांगितलं. मी राष्ट्रपती, पंतप्रधान होण्यासाठी धडपड करत आहे. माऊली मला एक दिवस राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनवतील. '
एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य
अभिजीत बिचुकले यांना 'बाळासाहेब ठाकरेंना सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती आवडली असती का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बिचुकले यांनी उत्तर दिलं, 'आज बाळासाहेब ठाकरे असते तर एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता.' त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधलं.
अभिजीत बिचुकले यांना हिंदी आणि मराठी बिग बॉसमुळे लोकप्रियता मिळाली. अभिजीत हे त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असून एकनाथ शिंदे आज संध्याकाळी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे आपल्या 35 समर्थक आमदारांसोबत सूरतमध्ये असून ते आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. ही बैठक अहमदाबादमध्ये होणार तसेच भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील हे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या भेटीला गेले आहेत. एकनाथ शिंदेसह इतर आमदारांचं बंड सफल झाल्यास महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना चांगलीच अडचणीत येणार आहे.
पाहा व्हिडीओ:
हेही वाचा: