मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज पहिल्यांदा ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पहिल्यांदाच एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 965 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 139 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 255 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज तीन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,24, 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 91, 13, 785 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 965 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 965 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 258 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 149 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
गेल्या 24 तासात देशात 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येत किंचीत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 67 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, काल देशात 1 हजार 778 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती, तर 62 जणांचा मृत्यू झाला होता. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 14 हजार 687 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
संबंधित बातम्या :
Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 67 जणांचा मृत्यू
कोरोनाच्या नियमावलीला हायकोर्टात आव्हान; लोकलमध्ये प्रवासाकरता लससक्तीचा निर्णय कोणत्या निष्कर्षांवर घेतला?, हायकोर्टाचा सवाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha