Mharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. आज राज्यात 165 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दोन करोना रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे. आज 157 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,28, 628 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.11 टक्के एवढे झाले आहे.
दोन महिन्यांपासून थोडासा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. काल राज्यात 186 रूग्ण सापडले होते. त्यात आज थोडीशी घट होऊन 165 रूग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच काल राज्यात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु, आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 87 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 961 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मु्ंबईत आज 90 नव्या रूग्णांची नोंद
मुंबईत आज 90 कोरोना रूग्णांची नोंद झाली. तर 91 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत 560 सक्रीय रूग्ण आहेत.
देशातील रूग्णसंख्येत वाढ
दरम्यान, देशभरा कोरोना रूग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 3,303 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या आकड्यांसह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 16 हजार 980 वर पोहोचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांसोबतच पॉझिटिव्हिटी दरही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी दर वाढून 0.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 25 लाख 28 हजार 126 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, आतापर्यंत 5 लाख 23 हजार 693 रुग्णांनी कोरोनामुळं जीव गमावला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासांत 39 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
महत्वाच्या बातम्या