Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दैनंदिन कोरोना रुग्ण कमी होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 782 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत राज्यात फक्त दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी नवी मुंबई आणि सोलापूरमध्ये कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात इतर ठिकाणी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,65,298 झाली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. दिवसभरात एक हजार 361 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,10,376 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.03 % एवढे झाले आहे. राज्यात सध्या 7228 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,78,24,854 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,65,298 (10.11 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,36,445 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 744 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईपेक्षा पुण्यात जास्त रुग्ण -
रविवारी राज्यात 782 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजही पुण्यात मुंबईपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. मुंबईत आज 103 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुणे मनपामध्ये 144 नवे रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 46, पुणे ग्रामीण 55 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय अहमदनगरमध्ये 79 रुग्ण आढळले आहेत. तर नवी मुंबईत 21, ठाणे 17, सातारा 22, नंदूरबार 20, नाशिक 18, बुलढाणा 36, नागपू 22 आणि नागपूर मनपा 35 त्याशइवाय गडचिरोलीमध्ये 15 नवे रुग्ण आढळले आहेत.
12 ठिकाणी एकही रुग्ण नाही -
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. राज्यातील तिसरी लाट ओसरली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची आज माहिती दिली होती. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यातील 12 मनपा, जिल्ह्याच्या ठिकाणी एकही रुग्ण आढळला नाही. तर अनेक ठिकाणी दहापेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत.
तिसरी लाट आटोक्यात, काळजी करण्याचा विषय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही राज्यातील तिसरी लाट आटोक्यात आल्याचे सांगितले आहे. जालना येथील कार्यक्रमात राजेश टोपे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘तिसरी लाट आटोक्यात आली आहे. काळजी करु नका.’ जालन्यात रविवारी पल्स पोलिओचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी टोपे म्हणाले की, ‘राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काळजी करण्याचा विषय नाही. राज्यात सध्या दहा टक्के पण रुग्ण राहिलेले नाहीत.‘ मास्क मुक्तीचा निर्णय विचार करून घेणार असल्याचे यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले. तिसरी लाट आटोक्यात आली असल्याची दिलासा देणारी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे दिली. तिसऱ्या लाटेच्या अनुशंगानं आज राज्यात दहा टक्के पण रुग्ण नाहीत. त्यामुळं तिसरी लाट आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आलं आलं आहे. मात्र कोरोना पूर्ण पणे हद्द पार झालाय अशा भ्रमात न राहता मास्क मुक्तीचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा लागेल, अशी माहिती टोपे यांनी दिलीये.