मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या  (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून  आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या  870 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 136   रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 128  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Continues below advertisement

राज्यात आज  दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज दोन कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,25, 919  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 95, 26, 982   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

Continues below advertisement

राज्यात सध्या  870 अॅक्टिव्ह रुग्ण 

राज्यात सध्या 870 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  270 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 134 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण

देशातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. देशात सुमारे दोन वर्षांनंतर सलग दुसऱ्या दिवशी एक हजार पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 795 नवे कोरोनाबाधित आढळले असून 85 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 913 नवीन रुग्ण आणि 13 जणांचा मृत्यू झाला. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 21 कोटी 416 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 208 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 54 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 416 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 96 हजार 369 लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या :

Adar Poonawala Coronavirus Update : भारतात कोरोनाबाधितांची संख्या कमी का झाली? अदार पूनावाला यांनी सांगितले...

Coronavirus Cases Today : दिलासादायक! देशात कोरोनाचा आलेख घटताच, गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha