Coronavirus Fourth Wave (Pune News) : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पण कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे.  मात्र कोरोनाची चौथी लाट आलीच तर ती सौम्य असेल असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum institute Of India)  मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला ( Adar Poonawala) यांनी केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.  यावेळी प्रवाशांसाठी बूस्टर डोस महत्त्वाचा असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. भारतात कोरोनाबाधितांची संख्या का कमी झाली यावरही त्यांनी भाष्य केले. 


अदर पूनावाला (Adar Poonawala) म्हणाले,  बूस्टर डोसबद्दल आम्ही काही महिन्यांपासून सरकारला आवाहन केले आहे.  प्रवास करणार्‍या प्रत्येकाला बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. सरकारशी चर्चा करत असून लवकरच बूस्टर धोरणाची घोषणा करण्यात येणार आहे. इतर सर्व देश बूस्टर डोस देत आहेत आणि भारताने देखील याकडे पाहण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने विलक्षण काम केले आहे. मोदी सरकारने 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण पूर्ण केले आणि आता बूस्टरची वेळ देखील आली आहे. सीरमने सरकारला आवाहन केले असून खात्री आहे की, सरकार बूस्टर डोसबद्दल सकारात्मक निर्णय घेईल.


भारतात कोरोनाबाधित का घटले? पूनावाला म्हणतात...


जूनमध्ये राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर बोलताना अदर पूनावाला म्हणाले, चौथी लाट तरी ती सौम्य असेल, असे त्यांनी म्हटले. आपल्या लशी या अन्य देशांच्या तुलनेत प्रभावी असल्याचे दिसून आले असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका आणि युरोपमध्ये बाधितांची संख्या वाढली. मात्र, आपल्याकडे संख्या कमी झाली आहे. आपण योग्य लस निवडल्याने बाधितांची संख्या कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशातील लसी इतर देशांच्या लसींपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत हे सिद्ध झालं असल्याचे त्यांनी म्हटले.  जगभरातील लसींच्या मिश्रणास बूस्टर डोससाठी परवानगी आहे. लसींचा पुरेसा साठा आहे आणि कोणतीही कमतरता भासणार नाही. 'बहोत माल है' अस म्हणत आदर पूनावाला यांनी आश्वासित केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Coronavirus Cases Today : दिलासादायक! देशात कोरोनाचा आलेख घटताच, गेल्या 24 तासांत 795 नवे रुग्ण


Mumbai Corona Update : मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम, 18 नव्या रुग्णांसह 50 जण कोरोनामुक्त


Maharashtra Corona Update : राज्यात आज 50 रुग्णांची नोंद तर एकही मृत्यू नाही