मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज देखील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 865 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. आज राज्यात 108 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 106 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज सात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज सात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,26, 025 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 95, 71, 752 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
राज्यात सध्या 865 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात सध्या 865 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 283 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 123 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण
गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1086 नवीन रुग्ण आढळले असून 71 जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 795 रुग्ण नोंदवले गेले आणि 58 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे.सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 871 इतकी कमी झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी दिवसभरात देशात 1 हजार 198 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 871 इतकी झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 487 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 97 हजार 567 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1086 रुग्ण, 71 जणांचा मृत्यू
Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha