Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनारुग्णांची(Mumbai Corona Update) संख्या आजही 50 च्या घरात आढळली आहे. आज 51 नव्या रुग्णांची नोंद झाली असून काल ही संख्या 56 होती. पण यासोबत आज मुंबईत कोरोनाचे दोन नवीन सबव्हेरियंट आढळले आहेत. मुंबईत `कापा´ आणि `एक्सई´ उपप्रकाराचे रुग्ण सापडल्याने पालिका प्रशासनाला (Mumbai BMC) सतर्क व्हावे लागणार आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज देखील एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 51 कोरोनाबाधित आढळले असून 38 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील 283 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 51 रुग्णांपैकी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेकडील 26 हजार 151 बेड्सपैकी केवळ 22 बेड सध्या वापरात आहेत.
मुंबईत कोरोनाचे दोन नवे सबव्हेरीयंट
कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये घट झाल्यामुळे राज्य सरकारने कोरोना निर्बंध उठवले आहेत. पण मुंबईतून चिंतेत टाकणारी बातमी आली आहे. मुंबईत कोरोनाचे दोन नवीन व्हेरियंट आढळले आहेत. मुंबईत `कापा´ आणि `एक्सई´ उपप्रकाराचे रुग्ण सापडले आहेत. कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (जिनोम सिक्वेंसिंग) अंतर्गत अकराव्या चाचणीमध्ये दोन नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत 99 टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- WHO ची Covaxin च्या पुरवठ्यावर बंदी, जाणून घ्या भारत बायोटेक काय म्हणाले?
- Corona in China : चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढताच, शांघायमध्ये एका दिवसात 8226 रुग्णांची नोंद, जगाची चिंता वाढली
- Coronavirus : धोका वाढतोय? मुंबईत आढळले कोरोनाच्या दोन नव्या व्हेरीयंटचे रुग्ण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha