मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी कमी आल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 1005 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 1044 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची राज्यात आज एकूण 11,968 इतके रुग्ण सक्रिय असून सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या ही मुंबईमध्ये असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये 2977 इतके सक्रिय रुग्ण असून त्या खालोखाल पुण्यामध्ये 2726 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात आतापर्यंत 79,00,626 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.01 इतके झाले आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचे मृत्यू प्रमाण 1.83 टक्के इतके झाले आहे.
देशातील स्थिती
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. देशात मागील 24 तासांत 16 हजार 167 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर रविवारी दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी म्हणजेच शनिवारी दिवसभरात 18 हजार 738 रुग्णांना नोंद आणि 40 रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोरोना रुग्ण संख्या घटली यासोबत दुसरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
देशात नवीन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोना संसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. रविवारी दिवसभरात 15 हजार 549 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आजपर्यंत 4 कोटी 34 लाख 99 हजार 659 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात गेल्या 24 तासांत 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 5 लाख 26 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या