Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 831 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8395 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत 35 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 30,547 ॲक्टिव कोरोना रुग्ण आहेत.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 8 हजार 695 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 76 लाख 69 हजार 772 इथकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.73 टक्के इतके झाले आहे. राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,66,39,114 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,47,746 (10.24 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,14,531 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1544 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


ओमायक्रॉनचे 351 नवे रुग्ण –
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ओमायक्रॉनचे नवीन 351 रुग्ण आढळले आहेत.  आज आढळलेल्या रुग्णापैकी 280 रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि 71 रुग्ण  बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी रिपोर्ट केले आहेत. आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णामध्ये औरंगाबादमधील प्रमाण सर्वाधिक आहे. औरंगाबादमध्ये 148 नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. तर नाशिक 111,  पुणे मनपा 72, पुणे ग्रामीण 12, पिंपरी चिंचवड 5, यवतमाळ 2 आणि साताऱ्यात एक रुग्ण आढळला आहे.  राज्यात आज आढळलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णामुळे एकूण रुग्णांची संख्या 4245 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3334 जणांना ओमायक्रॉनवर मात केली आहे.


मुंबईत रुग्णसंख्येत किंचित वाढ
मुंबईत (Mumbai) आज नवे 235 कोरोनाबाधित आढळले आहेत. कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या (Corona Updates) काहीशी अधिक आहे, कारण सोमवारी 192 नव्या बाधितांचीच नोंद झाली होती. पण आज मुंबईत एकाही रुग्णाचा मृच्यू न झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 235 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 446 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 301 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर कमी होऊन 0.04% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसंच आज नव्याने सापडलेल्या 192 रुग्णांपैकी 38 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 853 बेड्सपैकी केवळ 972 बेड वापरात आहेत.