Maharashtra Shiv Sena Sanjay Raut Press Conference : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यांवर शिवसेना फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडले. किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडताना संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख  'मुलुंडचा दलाल' असा केला. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, या या वेळेस धाड पडणार.. हा काय प्रकार आहे? तुम्हांला काय वाटत आम्हीं झुकू? बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल आहे, गुडघे टेकायचे नाहीत. तो 'दलाल' ज्याला मराठीत, शुद्ध मराठीत 'भडवा' म्हणतात त्याने म्हटले आहे की ठाकरे कुटुंबाने कोरलाई गावात 19 बंगले बांधले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे, कधी सांगा?, असा टीकेचा बाण संजय राऊत यांनी सोडला आहे. 


किरीट सोमय्या यांच्या दररोजच्या पत्रकार परिषेदाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'ठाकरेंचे 19 बंगले अलिबागमध्ये दिसले, तर राजकारण सोडेन.  बंगले दिसले नाहीत, तर सोमय्यांना शिवसैनिक जोड्याने मारेल.' सरकार पाडण्यात मदत नाही केली तर तपास यंत्रणा मागे लागतील, असे भाजप काही नेत्यांनी सांगितले. सरकार पाडण्यात मदत केली नाही तर केंद्रीय यंत्ऱणा टाईट करतील, असेही भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले. भाजपच्या काही नेत्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. सरकार पाडण्यात मदत नाही केल्यास तपास यंत्रणा मागे लावू, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात होतं. 


शिवसेनामध्ये संजय राऊत एकटे पडले आहेत, अशी टीका विरोधीपक्षांनी केली होती, या टीकेला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आनंद आढसूळ, अरविंद सावंत,विनायक राऊत,अनिल देसाई,दादा भुसे ,दिवाकर रावते , उदय सामंत , प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे,सचिन अहिर,आदेश बांदेकर
मनीषा कायदे,गजानन कीर्तिकर , संजय शिरसाठ यांच्यासह अनेक शिवसेना खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मुंबईसह पुणे, नाशिक, सोलापूर आणि इतर मोठ्या शहरातील शिवसेना कार्यलयाबाहेर शिवसैनिक जमले आहेत. पुणे आणि सोलापूरमध्ये पोस्टरबाजीही पाहायला मिळाली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीमधील सर्वच नेत्यांनी फोन करुन आशीर्वाद दिले आहेत.  खासदार संजय राऊत म्हणाले की, 'आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली. मन साफ असेल तर कुणालाच्या बापाला घाबरु नको, असे बाळासाहेब सांगायचे. ' खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू.  आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली."


संजय राऊत यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे..
महाराष्ट्रातील सरकार भाजपला पाडायचे आहे. 
केंद्रीय तपास यंत्रणाचे संकट पश्चिम बंगालसह महाराष्ट्रावर आहे.
संपूर्ण शिवसेना आज शिवसेना भवनात उपस्थित आहे. 
मराठी माणूस बेईमान नाही
कुणीही पाठीमागून वार केले तर शिवसेना सहन करणार नाही.
दमख्या दिल्या म्हणूनच पवार कुटुंबीयांच्या मागे ईडी चौकशी लागली.
महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीसांच्या काळात. महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा. भाजप सत्तेत असताना हरयाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का?