Maharashtra Corona Update : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी राज्यात 734 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. गुरूवार आणि शुक्रवारच्या तुलनेत आजची संख्या खूपच कमी आहे. कारण गुरुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. तर यात घट होऊन आज 734 नव्या रूग्णांची नोंद झालीय.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 1,216 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,55,268 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 9 टक्के झाले आहे.
मृत्यूमध्ये देखील घट कोरोना रूग्णसंख्येसह राज्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये देखील घट झाली आहे. काल राज्यात सहा बाधितांचा मृत्यू झाला होता. तर आज केवळ एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.
सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 6, 578 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 1900 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात 1560 तर ठाण्यात 1416 सक्रिय रूग्ण आहेत.
देशातील स्थिती देशातील देखील कोरोनाचा आलेख घसरला आहे. गेल्या 24 तासांत 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत 539 रुग्णांची घट झाली आहे. तर कोरोनाबळीही घटले आहेत. देशात गुरुवारी दिवसभरात 6093 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पूर्ण धोका टळलेला नाही
रूग्णसंख्येत घट होत असली तरी अद्याप कोरोनाचा संपूर्ण धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायची आहे. आरोग्य यंत्रणा देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येतंय.
महत्वाच्या बातम्या