Gauri Aras Competition 2022 : तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. 31 ऑगस्ट 2022 रोजी घरोघरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन झालं. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी घरोघरी गौरी विराजमान झाल्या. राज्यभरात गौरीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या निमित्ताने गौरीच्या सजावटीसाठी वेगवेगळी आरास करण्यात आली. राज्यभरात अनेक ठिकाणी गौरी सजावटीच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. एबीपी माझाने देखील यावर्षी पहिल्यांदाच आपल्या प्रेक्षकांसाठी गौरी आरास स्पर्धेचं (Gauri Aras Competition 2022) आयोजन केलं होतं. या स्पर्धेला प्रेक्षकांचा अगदी भरभरून प्रतिसाद पाहायला मिळाला. याच स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.


एबीपी माझाने आयोजित केलेल्या 'गौरी आरास स्पर्धे'मध्ये राज्यभरातून अनेक प्रेक्षकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या आरास स्पर्धेची सजावट पाहता प्रत्येकाने अगदी मनापासून गौरीची आरास केली होती. त्यामुळे विजेते निवडणं खरंतर खूप कठीण होतं. मात्र, ज्या स्पर्धकांची विजेते म्हणून निवड करण्यात आली त्यांची सजावट ही उत्कृष्ट तर होतीच. पण, त्या सजावटीच्या माध्यमातून काहींनी समोज प्रबोधन केलं, तर काहींनी सामाजिक संदेश दिला, काहींनी आधुनिक काळातील महिला दाखवली तर काहींनी आपली परंपरा जपली. 


देखाव्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन :


यामध्ये कोल्हापूरच्या सचिन जाधव यांनी साकारलेल्या देखाव्यात पारंपरिक खेळाचा देखावा दाखवला. तर,अहमदनगर येथील किरण मेटके यांनी परिचारिकेच्या (नर्सच्या) माध्यमातून महिला देखील सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत हे दाखवून दिले. कोरोना काळात आपल्या सगळ्यांनाच डॉक्टर आणि नर्स यांचे महत्त्व पटले आहे. काही देखाव्यात गावाकडची बैलगाडा शर्यत दाखवण्यात आली तर काही देखाव्यात आधुनिक स्त्री साकारण्यात आली. 


या यादीत सर्वोत्कृष्ट सजावट करणाऱ्या अशा 20 प्रेक्षक विजेत्यांचा समावेश आहे. आणि या विजेत्यांना एबीपी माझाकडून बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये विजेत्यांना एअरबड्स देण्यात येणार आहेत. त्यानुसार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.


विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे : 


1) ऐश्वर्या अटकेकर, सातारा


2) भक्ती जोशी, नाशिक


3) गौरी शितोळे, पुणे


4) रिद्धी भागवत, सातारा


5) शैलजा कुलकर्णी, औरंगाबाद


6) उज्ज्वला मराठे, जळगाव


7) उद्धव घाडगे, सातारा


8) उषा गायकवाड, सातारा


9) किरण नेटके, अहमदनगर


10) प्रितम कांबळे, सोलापूर


11) भाग्यश्री आघाव, अंबाजोगाई


12) मृदुला कुलकर्णी, नाशिक


13) सौ. विपुला विनीत पिंगळे


14) वृषाली वाघ, पुणे


15) वैभवी मोहीरे, अहमदनगर


16) हर्ष फरांदे, सातारा


17) सुरज जाधव, पुणे


18) सचिन जाधव, कोल्हापूर


19) किशोरी जगताप, पुणे


20) शुभम राजकुमार पाळेकर, वर्धा


एबीपी माझाच्या गौरी आरास स्पर्धेसाठी तब्बल 1268 फोटोंच्या प्रवेशिका मेलच्या माध्यमातून मागविण्यात आल्या होत्या. 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान हे फोटो मागविण्यात आले होते. त्यानुसार काल (अनंत चतुर्दशीला) स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेतील 20 विजेत्यांना एअरबड्स देण्यात येणार आहेत. 


एबीपी माझाकडून प्रेक्षक वर्गाच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून कायमच वेगेवेगळे उपक्रम राबविले जातात. त्यानुसार, या वर्षी प्रथमच माझाने प्रेक्षक वर्गासाठी गौरी आरास स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला. 


महत्वाच्या बातम्या :