Maharashtra Corona Update : गेल्या चार दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. आज राज्यात 701 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा आज मृत्यू झालाय.  गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रुवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. तर शनिवारी 734 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. आज राज्यात 701 नव्या रूग्णांची नोंद झालीय. ही आकडेवारी पाहाता गेल्या चार दिवसांमध्ये रोज नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत आहे.

  


राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज 1056 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 79,56,324 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98. 10 टक्के झाला आहे.  


तीन बाधितांचा मृत्यू 
कोरोना बाधितांच्या मृत्यूमध्ये चढ-उतार होत आहेत. शुक्रवारी राज्यात सहा बाधितांचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी केवळ एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आज राज्यात तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे.
 
सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत 
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 6220 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 1711 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात 1437 तर पुण्यात 1370 सक्रिय रूग्ण आहेत. परंतु, राज्यासह मुंबईत देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 187 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे.तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


देशातील स्थिती 


देशातील कोरोना रूग्णांच्या संख्येत देखील घट होत आहे. देशात गेल्या 24 तासांत 5 हजार 76 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 47 हजार 945 इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात देशात 11 कोरोनाबाधितांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोना रुग्णांसह सक्रिय रुग्ण आणि मृत्य झालेल्या रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. देशात शुक्रवारी 5554 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 5076 नवीन रुग्णांची नोंद आणि 11 जणांचा मृत्यू झाला आहे.