मुंबई : राज्यात आज 2435 कोरोनाच्या (Corona) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 2882 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 3318 सक्रिय रुग्ण (Active Patient) आहेत.
राज्यात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्यात आज 13 कोरोनाबाधित (Corona Death) रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.84 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 42,090 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.93 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात आज एकूण 17567 सक्रिय रुग्ण
राज्यात आज एकूण 17567 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे 3318 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यात 1947 सक्रिय रुग्ण आहेत.
बी ए. 4 आणि बी ए. 5 व्हेरीयंटचे 6 आणि बी ए. 2.75 चे तीन रुग्ण आढळले
बी ए.5 व्हेरीयंटचे आणि बी ए. 4 व्हेरीयंटचे सहा रुग्ण आणि बी ए. 2.75 चे तीन रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि सोलापूर येथील आहेत. हे सर्व रुग्ण लक्षणविरहित असून ते घरगुती विलगीकरणात बरे झाले आहेत.
देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट
भारतात एका दिवसात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे 13,615 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 4,36,52,944 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,31,043 वर पोहोचली आहे. सोमवारी नोंदवलेल्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 20 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतात मृतांची संख्या 5,25,474 झाली आहे. देशात कोविड-19 वर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,31,043 वर पोहोचली आहे, जी एकूण रूग्णसंख्येच्या 0.30 टक्के आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 330 ने वाढली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा दर 98.50 टक्के आहे.