मुंबई : राज्यावरील कोरोनाचे  (Coronavirus) संकट अधिक गडद होत असून आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यात आज तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,475  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.  


राज्यात आज 6 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज  6 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एकूण 460 ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे.


मुंबईत आज 6 हजार 347 नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात 631 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 


गेल्या सात दिवसातील कोरोना रूग्ण संख्या 


31 डिसेंबर - 8067 रुग्ण
30 डिसेंबर -  5368 रूग्ण
29 डिसेंबर - 3900 रूग्ण
28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर –  1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर –  1485 रूग्ण


राज्यात आज 7 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 7  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 9 हजार 170 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 10 हजार 541 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.  सध्या राज्यात 2 लाख 26 हजार 01 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1064  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत 6,91,36,643 लोकांच्या प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. त्यापैकी 66,87,991 म्हणजे 9.67 टक्के लोक कोरोना बाधित सापडले आहेत. 


देशाची स्थिती
देशात कोरोनाचा धोका वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाबरोबर ओमायक्रॉनच्या रुगणसंख्येत देखील वाढ होत आहे. देशात गेल्या 24 तासामध्ये 22 हजार 775 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 हजार 949 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर गेल्या 24 तासामध्ये देशात कोरोनामुळे 406 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या भारतातील सक्रिय रुग्णांचा आकडा हा 1 लाख 4 हजार 781 आहे. तर रिकव्हरी रेट 98.32 टक्के आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :