Rajesh Tope : सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी निर्बंधांचे पालन करणे गरजेचे असल्याचे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. दरम्यान, आज राज्यात 12 ते 15 हजार कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या रोखणे त्याचबरोबर निर्बंधांचे पालन करणे हे राज्य सरकारसमोरील मोठे आव्हान असल्याचे टोपे यावेळी म्हणाले. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे कडक निर्बंध लावण्याचे संकेत देखील टोपे यांनी दिले आहेत.


मेट्रो सिटीमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत.  ओमायक्रॉन आणि डेल्टा या मधील फरक समजणे खूप गरजेचे आहे. कारण त्यावरुन किती टक्के रुग्ण वाढीचा वेग आहे हे समजमार आहे. सध्या लसीकरणही सुरू आहे, त्याटा वेग वाढवत आहोत. येत्या 3 तारखेपासून 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांनी लसीकरण देणार आहोत. त्याचीही तयारी झाल्याचे टोपे यावेळी म्हणाले. रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊन लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात जास्त प्रमाणात बेड, आयसीयू आणि ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते. रुग्णालयांना किट्स वापरण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ओमायक्रॉन आणि डेल्टा रुग्णांना ओळखणं गरजेचं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वांनी कोरोना नियमांचे आणि निर्बंधाचे पालन करणं गरजेच आहे. हे सर्वांसमोरील एक आव्हान असेल. रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच संसर्गावर आळा घालण्याला आमचे प्राधान्य आहे.  


दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन तासांची बैठक झाली. यामध्ये लॉकडाऊनवर चर्चा झाली नाही. इतक्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही. पण निर्बंधावर भर दिला जाणार आहे. राज्यात आज 12 ते 15 हजारांच्या आसपास रुग्णसंख्या आढळण्याची शक्यता आहे. तसेच बेड व ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या सिनेमा, रेस्टॉरंटवर निर्बंध लावण्याबाबत कोणताही विचार केला नाही. लहान मुलांच्या लसीकरणाची स्ट्रॅटेजी तयार करायची आहे. त्याबाबत प्रशासनाची बैठक झाली. 


महत्त्वाच्या बातम्या: