Mrunal Thakur : बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण झाली आहे. मृणालचा 'जर्सी' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मृणालने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे. मृणालने लिहिले आहे, मला कोरोनाची लागण झाली आहे. मला सौम्य लक्षणे जाणवत असून सध्या मी स्वत:ला आयसोलेटेड केले आहे. त्यासोबत डॉक्टरांनी दिलेल्या सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. 


कार्तिक आर्यनच्या 'धमाका' सिनेमाच्या माध्यमातून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मृणालचा आगामी 'जर्सी' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय होऊ शकत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 



जगभरासह मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. 28 डिसेंबर रोजी नोरा फतेहीलादेखील कोरोनाची लागण झाली होती. अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर, चुलत बहीण आणि डिझायनर रिया कपूर आणि तिचा नवरा करण बुलानी यांनादेखील नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. 


साउथचा रिमेक 
'जर्सी' हा टॉलिवूड सुपरहिट चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'जर्सी' सिनेमात शाहिद कपूर एका क्रिकेटरचे पात्र साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केले आहे. सिनेमात पंकज कपूरसोबत मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहिद आणि मृणाल पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. सिनेमात मृणाल ठाकूर शाहिदच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. 


संबंधित बातम्या


Jersey Movie Posponed : 'जर्सी' सिनेमाला कोरोनाचा फटका; रिलीज डेट ढकलली पुढे


Kangana Ranaut : पोलीस आणि FIR पासून वाचव देवा! नवीन वर्षात कंगना रनौतचे तिरुपती बालाजीला साकडं


अक्षयकडून गायत्री मंत्रोच्चार तर बिग बींची खास पोस्ट; पाहा असं केलं बॉलिवूड कलाकारांनी नवीन वर्षाचं स्वागत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha