मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली असली तरी शनिवारच्या तुलनेत त्यात काहीशी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 892 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 16 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यातील 1,063 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात सध्या 14,526 इतकी सक्रिय रुग्णसंख्या असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.6 टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असून राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका झाला आहे.
राज्यात सध्या 1,48,743 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 968 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 6,32,40, 769 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
देशातील स्थिती
मागील 24 तासांत देशात दहा हजार 853 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 526 जणांचा मृत्यू झालाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची देशातील संख्या चार लाख 60 हजार 791 इतकी झाली आहे. 12 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाख 44 हजार 845 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 37 लाख 49 हजार 900 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लसीकरणाचा 108 कोटींचा टप्पा पार
कोरोनावर मात करण्यासाठी देशात वेगानं लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. 24 तासांत देशभरात 28 लाख 40 हजार 174 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशात 108 कोटी 21 लाख 66 हजार 365 जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : 24 तासांत देशात 10 हजार 853 नवे रुग्ण, 526 जणांचा मृत्यू
- Coronavirus : फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे पाच लाख मृत्यूची भिती, WHO ने व्यक्त केली चिंता
- कोरोनावरील उपचारासाठी आणखी एक 'अस्त्र'; 'या' देशाने दिली गोळीला मंजुरी