मुंबई : राज्यातील कोरोनाची (Maharashtra Corona Update) रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. आज राज्यामध्ये 511 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये एकूण 324  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत


आज एका कोरोनाबाधितांचा मृत्यू  


राज्यात आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,34, 110  कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात 2361 सक्रिय रुग्णांची नोंद


राज्यात आज एकूण 2361 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1658 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 298  इतके सक्रिय रुग्ण आहेत.


देशात गेल्या 24 तासांत 2628 नवीन कोरोना रुग्ण


आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 2628 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, कोरोना संसर्गामुळे एका दिवसात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीनंतर देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा एकदा 15 हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज कोरोनाचे जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाचा बरा होण्याचा दर 98.75 टक्के आहे. दुसरीकडे, जर आपण सकारात्मकता दराबद्दल बोललो, तर देशात दररोज सकारात्मकता दर 0.58% आहे. गेल्या 24 तासांत एकूण 2167 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशात 84 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत 4 लाख 52 हजारांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. 


संबंधित बातम्या :


India COVID-19 cases : भारतात गेल्या 24 तासांत 2628 नवीन कोरोना रुग्ण, तर 18 जणांचा मृत्यू