मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता जवळपास नियंत्रणात आल्याचं चित्र आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही  दिवसेंदिवस कमी होत असून आज राज्यात केवळ 52 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 107 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत 77,25,791 कोरोनाबाधित उपचार घेऊन बरे झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके झाले आहे. 


राज्यात आज एकही मृत्यू नाही
राज्यात आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली नाही. रविवारी राज्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.87 टक्के इतका आहे. 


राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली असून आज 866 इतके सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 267 सक्रिय रुग्णसंख्या ही पुण्यामध्ये आढळली असून त्या खालोखाल 250 इतकी संख्या मुंबईत आहे. 


देशातील स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी 913 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात 1 हजार 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 597 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख हजार 821 झाली आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13 हजारांच्या खाली पोहोचली आहे. सध्या देशात 12,597 रुग्ण उपचाराधीन आहेत. 18 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदा भारतात 1,000 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2020 रोजी 991 रुग्णांची नोंद झाली होती.


महत्त्वाच्या बातम्या: