Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46,723 नव्या रुग्णांची भर झाली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 28,041 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात मंगळवारी 34,424 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्या तुलनेत आज जवळपास 12 हजार अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.
राज्यात 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 1367 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 734 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 32 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 32 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 66 लाख 49 हजार 111 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.52 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 29 हजार 452 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 6951 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,11,42,569 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या सात दिवसांतील रूग्णसंख्या
11 जानेवारी- 18,967 रूग्ण
10 जानेवारी - 29,671 रूग्ण
9 जानेवारी - 44, 388 रूग्ण
8 जानेवारी - 41, 134 रूग्ण
7 जानेवारी - 40, 925 रूग्ण
6 जानेवारी - 36,265 रूग्ण
5 जानेवारी - 26, 538 रूग्ण
मुंबईत 16 हजार 420 कोरोनाबाधित
मुंबईत गेल्या 24 तासांत 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची एकूण संख्या 16 हजार 420 इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :