कोल्हापूर : शरद पवार यांचीच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू आहे का, असं दिसत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. कारण, शरद पवार हेच सर्व आंदोलक संघटनांशी बोलत असतात, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत जे घडलं ते सगळ्यांनी पाहिलंच आहे. नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्याचा डाव होता हे एका वहिनीच्या स्टिंगवरून समोर आले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे काँग्रेसने आता तरी मान्य करावे की, पंजाब सरकारने योग्य ती सुरक्षा पुरवली नाही ते. काँग्रेस आणि इतर पक्षांनी या घटनेची खिल्ली उडवली असल्याचे देखील पाटील म्हणाले. सुरक्षा म्हणून संबधित लोकांना बाजूला करणे गरजेचे होते, पण असे काहीच घडले नाही. जिथे ही घटना घडली तिथे शेतकऱ्यांबरोबर खलिस्तानी देखील होते असे पाटील म्हणाले.
ज्या रूटवरून पंतप्रधान जाणार त्या रूटवर काहीतरी गडबड होणार असल्याचे अधिकाऱ्यांच्या संभाषणामधून समोर आले असल्याचे पाटील म्हणाले. जिथे ही घटना घडली तिथे शेतकऱ्यांबरोबर खलिस्तानी देखील होते. पाकिस्तनाची सीमा केवळ 13 किलोमीटर अंतराव होती. पंतप्रधान जाणार त्या मार्गावरील सर्व दुकाने बंद करायची असतात. पण असे काहीच केले नव्हते असे पाटील यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि इतर पक्षांनी या घटनेची खिल्ली उडवली. प्रियांका गांधी यांना सर्व रिपोर्ट करत होते, म्हणजे हे सर्व प्री प्लॅन होता का? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या घटनेविरोधात भाजप रस्त्यावर उतरून निषेध करणार असल्याचे पाटील म्हणाले. ज्या ठिकाणी भाजप सरकार नाही त्याठिकाणी केंद्राबरोबर संघर्ष केला जात आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शरद पवार यांनी स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणलं नाही तरी धरून आणलेले का असेना पण गोव्यात एक गुजरातमध्ये एखादा आमदार असतो असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीनी भाजपच्या चिन्हावर लढावे. त्यांनी भाजप पूर्ण सहकार्य करेल असे पाटील यावेळी म्हणाले.
कोरोनाच्या नियमावलीवरुन देखील पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. कोरोनाबाबत जे नियम लावलेत त्याचा कशाचा कशाला काही संबध नाही. याबाबत सगळ्यांनी बसून किमान एक वाक्यता आणली पाहिजे असे यावेळी पाटील म्हणाले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांनाही टोला लगावला. हसन मुश्रीफ यांना कागल सोडून बाकी काही माहीत नसते असे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: